संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

टीम अॅग्रोवन

सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांची अवस्था चांगली असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात या हंगामात ९० टक्के  क्षेत्रावर पिकांचा पेरा झाला असून खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरून निघण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या पेरणीस उशीर झाला होता. त्यानंतर मात्र पोषक वातावरणामुळे पेरणीची कामे गतीने शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती. रब्बी हंगाम दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा तालुक्याचा प्रमुख हंगाम असल्याने या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत रब्बी हंगामातील ९० टक्के पेरणीची कामे झाली असून सर्वाधिक रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या ज्वारीची कणसे भरू लागली आहेत. जिल्ह्यात १७ टक्के रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी पिकांची अवस्था चांगली असल्याने ज्वारीच्या उत्पादनात फारशी घट होणार नाही. तसेच चाऱ्यासाठी कडबा उपयुक्त ठरणार आहे. 

जिल्ह्यात गहू पिकांचे क्षेत्र वाढले असून १०७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सध्या लोंब्या पडण्याची प्रक्रिया सुरू आहे. थंडी कमी जास्त होण्यामुळे परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, सध्या पिकांची अवस्था चांगली असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. हरभऱ्याची ९५ टक्के लागवड झाली असून सुरवातीस लागवड झालेल्या हरभऱ्याला घाटे भरले आहेत. तसेच उशिरा लागवड झालेला हरभरा फुलोऱ्यात आहे. कांद्याच्या दरातील तेजीमुळे जिल्ह्यात कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे.    कांद्याच्या क्षेत्रात वाढ जिल्ह्यात रब्बीत दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवड झाल्यामुळे उत्पादनातही मोठी वाढ होणार आहे. आंतरपीक म्हणून कांदा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने जिल्ह्याच्या पश्चिम भागातही कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT