संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात हळद लागवडीचे नियोजन पूर्ण

टीम अॅग्रोवन

सांगली  ः यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हळद लागवडीपूर्व मशागती करुन ठेवल्या आहेत. यंदा हळद लागवडीचा हंगाम रविवारपासून (ता. २६) सुरु होत आहे. शेतकऱ्यांनी घरीच बियाणे तयार करुन पेरणीचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या हंगामात हळदीच्या क्षेत्रात वाढ होईल, अशी शक्‍यता हळद संशोधन केंद्राने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव या तालुक्‍यांत हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हळद लागवडीपूर्व मशागती करुन ठेवल्या आहेत. रविवारी (ता. २६) हळद लागवडीचा मुहूर्त केला जाणार असून त्यानंतर लागवड केली जाईल.

गेल्यावर्षी जिल्ह्यात सुमारे १ हजार २०० हेक्‍टर क्षेत्रावर हळद पीक होते. ऑगस्ट महिन्यात महापूरामुळे हळदीचे मोठे नुकसान झाले होते. परिमाणी यंदा हळदीचे बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक शेतकरी एकत्र येवून नवीन हळदीचे बियाणे कोईमतूरवरुन मागवले आहे.   हळद संशोधन केंद्रातील बियाणे झाले खराब जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महापूर आला. त्यानंतर अतिवृष्टी झाली. या साऱ्याचा फटका हळद संशोधन केंद्रातील बियाण्याला बसला आहे. सर्वसाधारणपणे संशोधन केंद्रातील ५० ते ६० टक्के बियाणे पाण्यामुळे खराब झाले आहे. उर्वरित बियाण्याची विक्री झाली असल्याचे हळद संशोधन केंद्राच्या सुत्रांनी सांगितले.   बाजार समितीत बियाणांची विक्री थांबली कोरोना विषाणूमुळे सांगली बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. बाजार समितीत दरवर्षी व्यापाऱ्यांकडून हळद बियाणांची विक्री होती. परंतू बाजार समिती बंद असल्याने बाजार समितीच्या आवारात हळदीचे बियाणे आलेच नसल्याने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नाही.

गेल्यावर्षी महापूराने हळद पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा बियाणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा ग्रुप करुन आम्ही कोईमतूर येथून १० टन हळदीचे बियाणे घेऊन येणार आहोत, असे डिग्रज येथील हळद उत्पादक शेतकरी  प्रमोद पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT