पिकास अपेक्षित प्रमाणात बटाटे न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
पिकास अपेक्षित प्रमाणात बटाटे न आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 
मुख्य बातम्या

पिकाला बटाटेच आले नाही ! अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सुर्यकांत नेटके

नगर ः बटाटा पिकाची लागवड करून सुमारे दोन महिन्यांचा कालावधी उलटला. आता पंधरा दिवसाने पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आलेले नाहीत.  लागवड करुनही बटाटे न आल्याने अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडीसह परिसरातील सहा ते सात गावांतील दोनशेवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

कृषी विभागाने काही ठिकाणी बटाटा पिकाची पाहणी केली असून पीक आले नसल्याचे मान्य केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करावी, असे सांगितले आहे. या भागातील शेतकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार साधारण दोनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर असे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा कोट्यवधींचा फटका बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.   See Video on Instagram...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AGROWON (@agrowondaily) on

अकोले (जि. नगर) तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडी, मन्याळ, कळंब, खुंटेवाडी, जावळले बदगी, जाधववाडी, चैतन्यपुर आदी भागात प्रामुख्याने बटाट्याचे पीक घेतले जाते. यंदा दोन ते सव्वादोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी बटाट्याची लागवड केली. आता पंधरा दिवसांत पीक काढणीला येण्याचा काळ असताना अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकाला बटाटे आलेच नाहीत. बटाट्याच्या ठोंबाला केवळ मुळ्या आहेत. काही ठिकाणी प्रत्येक ठोंबाला दोन- तीनच बटाटे लागली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांत खळबळ उडाली.

तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, कृषी सहाय्यक अशोक धुमाळ यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारींनुसार पाहणी केली असून बटाटे आले नसल्याचे मान्य केले आहे. साधारण सहा ते सात गावांतील दोनशेपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळ्यात टोमॅटोच्या नुकसानीतून मोठा फटका बसलेला असताना आता तालुक्यात बटाट्यानेही दगा दिला असल्याने शेतकरी हतबल झाले  आहेत.    लागवडीसह कष्टही गेले वाया अकोले तालुक्यातील सहा ते सात गावांत बटाट्याचे पीक आले नसल्याने शेतकऱ्यांचे कष्ट आणि लागवड, बेणे, खतांचा खर्चही वाया गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार केवळ लागवड, बेणे, खते व इतर खर्च कोट्यवधींच्या घरात आहे. बटाटा पिकाच्या बाबतीत हा प्रकार प्रथमच झाला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.  प्रतिक्रिया आमच्या भागात प्रामुख्याने बटाट्याचे पीक घेतले जाते. मात्र यंदा पीकच आले नसल्याने मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. तसेच यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहेत. त्यामुळे बटाटे न येण्याची कारणे शोधून शासनाने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी. बटाटा या पिकासाठी विमा संरक्षण कवच मिळावे.  -चंद्रकांत सीताराम गोंदके, सरपंच, करंडी, जि. नगर.   तालुक्यातील काही गावांत बटाटा पीक आले नाही हे खरे आहे. प्रथमच या भागात असे झाले आहे. आम्ही पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारी आल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती पाहणी करून पुढील निर्णय घेईल.  - प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी, अकोले, जि. नगर. See Video..

नगर : पंधरा दिवसाने बटाटा पीक काढणीला येईल, मात्र अजूनही पिकाला अपेक्षित प्रमाणात बटाटे आले नाहीत. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा, करंडीसह सात गावांतील दोनशेवर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. .#अकोले #नगर #बटाटा #शेती #शेतकरी #पीक #पीकनुकसान #खरीप #खरीप२०२० #ग्रामीण pic.twitter.com/zbG0iUWs2M

— AGROWON (@AGROWON)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT