संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक शेतकऱ्यांना फटका

टीम अॅग्रोवन

पुणे ः गेल्या आठवड्यात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यातील बहुतांशी गावांना फटका बसला आहे. ८७ गावांतील ३१७ शेतकऱ्यांचे सुमारे १००.५३ हेक्टरवरील पॉलिहाउस व शेडनेटचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे नजर अंदाजाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात पंचनामे झाल्यानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची नजर अंदाजाद्वारे माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने घेतली आहे. त्यातून पॉलिहाउस व शेडनेटधारकाचे नुकसानही अधोरेखित झाले आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. पंचनामे झाल्यानंतर या नुकसानीची नेमकी माहिती समोर येईल. त्यानंतर पंचनाम्याचा अहवाल शासनाला सादर करून नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.  

जिल्ह्यात पॉलिहाउस व शेडनेटमध्ये फुले, फळभाज्यांचे मोठया प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यात फुलांचे सर्वाधिक उत्पादन मावळ तालुक्यात होते. याशिवाय मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, हवेली, पुरंदर तालुक्यातील अनेक भागांतही फुले व फळभाज्यांचे उत्पादन पॉलिहाउस, शेडनेटच्या माध्यमातून घेतले जाते.

चक्रीवादळामुळे पॉलिहाउस, शेडनेटचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पॉलिहाउस, शेडनेट पूर्णतः पडले असल्याचे चित्र आहे. मात्र, कृषी विभागाच्या नजर अंदाज अहवालामध्ये भोर, बारामती, इंदापूर, दौंड तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये पॉलिहाउस व शेडनेटचे नुकसान झाल्याचे नमूद आहे.

जिल्ह्यात सुमारे ७० गावांतील २६७ शेतकऱ्यांचे ८७.७३ हेक्टरवरील पॉलिहाउसचे, तर १७ गावांतील ५० शेतकऱ्यांचे १३ हेक्टरवरील शेडनेटचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मावळ तालुक्यात झाले आहे.  

तालुकानिहाय झालेले पॉलिहाउस, शेडनेटचे नुकसान (हेक्टर)
तालुका गावांची संख्या शेतकरी संख्या  झालेले एकूण नुकसान
पुरंदर १.१३
जुन्नर  २० ७५  २३
शिरूर १३  १३ १.४०
आंबेगाव २२ २.८०
खेड ४.३०
हवेली  १.४२
वेल्हा ०.१०
मावळ २६ १३७ ५९.४८
मुळशी  ५३  ६.९०
एकूण ८७ ३१७ १००.५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beed Lok Sabha : बीडमध्ये ५५ वैध उमेदवार; छाननीअंती १९ उमेदवार बाद

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT