पालकमंत्री संजय राठोड
पालकमंत्री संजय राठोड 
मुख्य बातम्या

शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे सुरु करा : पालकमंत्री संजय राठोड 

टीम अॅग्रोवन

  यवतमाळ  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेता हमीभाव केंद्रे सुुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. राठोड बोलत होते. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांच्यासह सीसीआय, पणन महासंघाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. श्री. राठोड म्हणाले, की जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची आवश्‍यकता असल्याने शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन हमीभावानुसार शेतकऱ्यांकडून कापसाची खरेदी करण्यात यावी. कापसासोबतच तूर, हरभरा खरेदीचा देखील मुद्दा ऐरणीवर आहे. विदर्भ मार्केटींग फेडरेशन तसेच जिल्हा पणन अधिकाऱ्यांमार्फत तूर, हरभरा खरेदी केंद्रांची प्रक्रिया राबविण्यात यावी.

जिल्हयात १६ खरेदी केंद्रे असून दिग्रस, दारव्हा, नेर व मारेगाव या तालुक्‍यांत निधी व गोदामाअभावी तूर खरेदी अडचणीत आली होती. परंतु पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने संबंधित यंत्रणांचा योग्य समन्वय घडवून जिल्ह्यात सर्व खरेदी केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी सुरु करण्यात आली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर खरेदी केंद्रांवर वीस गाड्यांना परवानगी असेल. खरेदी प्रक्रिया राबवितेवेळी सॅनिटायझर, हॅन्डवॉश, मास्कची सुविधा ठेवणे गरजेचे आहे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या.   कापसाची सर्वाधिक खरेदी जिल्ह्यात पणन महासंघाची ९ केंद्रे आहेत. आतापर्यंत या केंद्रांवर ६ लाख ७० हजार ७२२ क्‍विंटल, सीसीआयच्या दहा केंद्रांवर १६ लाख ७५ हजार ४२ क्‍विंटल तर व्यापाऱ्यांकडून १० लाख ८३ हजार ७३९ क्‍विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४४ लाख ८४ हजार १७६ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT