विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर 
मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची  अवहेलना केली ः प्रविण दरेकर

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग  ः सरसकट कर्जमाफी देणार, सातबारा कोरा करणार अशी आश्‍वासने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची अवहेलना केली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी येथे केली.

श्री. दरेकर सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी (ता. २) सावंतवाडी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार रमेश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, महेश सारंग, संजू परब, पुखराज पुरोहित, प्रसाद आसविलकर आदी उपस्थित होते.

श्री. दरेकर म्हणाले, की ज्या कोकणाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले त्याच कोकणावर शिवसेनेने अन्याय केला आहे. १५ आमदार असताना कोकणाला एक मंत्रिपद देण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक विकासकामांना स्थगिती देण्यात आली आहे. गणपतीपुळ्यासारख्या देवस्थानच्या कामाला देखील स्थगिती देण्यात आली आहे. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. राज्यातील जनतेने युतीला जनादेश दिला होता. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी विविध विचारधारेचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व, मराठी अस्मिता, मराठी माणूस आदी विषयांना तिलांजली दिली आहे, अशी टीकादेखील त्यांनी केली.

प्रथमच निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांना कॅबिनेटमंत्री करण्यात आले. वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री हे हजारो शिवसैनिकांना पटलेले नाही. अनेक आमदार शिवसेनेत नाराज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु नाराज आमदारांच्या संपर्कात आहोत किंवा नाहीत याबाबत त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT