संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

मॉन्सूनची आणखी प्रगती शक्य

टीम अॅग्रोवन

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) मजल दरमजल करत देशाकडे वाटचाल करत आहेत. आज (ता.३१) अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यता आहे. तर उद्या (ता.१) मॉन्सून देवभुमी केरळमध्ये दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचेही भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

‘अम्फान’ चक्रीवादळामुळे १७ मे रोजी मॉन्सून अंदमान, निकोबार बेटांवर दाखल झाला होता. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्यानंतर दहा दिवस मॉन्सून अडखळला होता. मात्र बुधवारी (ता.२७) मॉन्सूनचे प्रवाह बळकट होत उत्तरेकडे वाटचाल सुरू झाली. गुरूवारी (ता.२८) दुसऱ्याच दिवशी मॉन्सूनने संपूर्ण अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात धडक दिली. मात्र त्यानंतर पुन्हा दोन दिवस बंगालच्या उपसागरात वाटचाल रेंगाळली असून, वाऱ्यांनी पुढे चाल केलेली नाही.

दरम्यान, अरबी समुद्रावरूनही मॉन्सूनची वाटचाल सुरू झाली असून, मालदिव आणि कोमोरीनसह श्रीलंकेच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात सोमवारपर्यंत (ता.१) नवीन कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या प्रणालीमुळे मॉन्सून वारे खेचून आणण्यास पोषक तयार होत असल्याने १ जून रोजी मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ओमान किनाऱ्यालगत वादळाचे संकेत अरबी समुद्राच्या पश्‍चिम-मध्य भागात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राचे आज (ता.३१) ओमान किनाऱ्यालगत कमी तीव्रतेचे वादळ (डीप डिप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारी (ता.३०) ही प्रणाली ओमानच्या सलालाहपासून ३० किलोमीटर उत्तरेकडे तर येमेनच्या घायदाहपासून उत्तरेकडे २४० किलोमीटर अंतरावर होती. आज वायव्येकडे सरकून जमिनीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मालदीव आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य भागात उद्यापर्यंत (ता.१) नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT