कसबे सुकेणेतील शेतकऱ्याने गरजूंसाठी खुली केली गव्हाची रास
कसबे सुकेणेतील शेतकऱ्याने गरजूंसाठी खुली केली गव्हाची रास 
मुख्य बातम्या

गरजूंसाठी या बळीराजाने खुली केली गव्हाची रास...!!!

मुकुंद पिंगळे

नाशिक : सध्याच्या टाळेबंदीच्या काळात हातावर प्रपंच असणाऱ्या घटकाला धान्याची मदत करून जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता.निफाड) येथील प्रविण रामराव पाटील यांनी  माणूसकी दाखवत या कुटुंबांना मोठा आधार दिला आहे.   प्रविण पाटील हे तरुण शेतकरी असून चालू वर्षी त्यांनी तीन एकर क्षेत्रावर गहू पेरला होता. त्यापैकी एक एकर गव्हाची सोंगणी करून मळणी झाली. हा गहू शेतात रास करून ठेवलेला होता. याच दरम्यान लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हातावर प्रपंच असलेली एक महिला सकाळीच घरी आली अन म्हणू लागली, "काही शीळं पाकं उरलेलं अन्न असेल तर द्या, आता आमचं हातचं काम गेलयं, आता कुणाकडे पैसा नाही, काही उरलं तर देत जा." या महिलेची विनवणी पाहून प्रविण पाटील यांनी मानवतेच्या भावनेने मदतीसाठी हात पुढे केला. ‘‘आता तुम्ही शीळं पाकं नाही तर, तर ताजं अन्न खा, माझ्याकडचा गहू घेऊन जा, आणि इतर गरजूंना पण सांगा’’, असे सांगत गरजेपुरता गहू दिला. गावातील मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे मजूर कामाविना बसून आहे. काही कुटुंबांकडे तर अन्नधान्याचा तुटवडा असल्याची बाब लक्षात आल्यानंतर प्रविण पाटील यांनी कोणताही विचार न करता काढलेली २० क्विंटल इतकी असलेली गव्हाची रास सामाजिक भावनेतून खुली करून दिली. गावातील गरजू लोकांची गर्दी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे यासाठी शेताकडे येणाऱ्या रस्त्यावर ठराविक अंतरावर पांढरे चौकोन आखून गहू वाटप करताना अंतर ठेवण्याचे आवाहन केले. त्यांचे वडील रामराव बाळाजी पाटील, आई तसेच त्यांच्या पत्नी यांनी या निर्णयाचे स्वागत केले . 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT