संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पानपिंपरी, विड्याच्या पानाला पीकविम्याच्या कक्षेत आणण्याची मागणी

टीम अॅग्रोवन

बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे पीक विम्याच्या कक्षेत आणून या उत्पादकांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जावा, अशी मागणी अमरावती विभागातील या शेतकऱ्यांनी शासनाकडे केली. या अनुषंगाने सोमवारी (ता.२८) प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.

बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अमरावती विभागात सर्व जिल्ह्यात विड्याच्या पानांचे उत्पादन केले जाते. बुलडाणा जिल्ह्यात सोगोडा, वडगाव वाण, वारखेड, उमरा पानाचे, एकलारा, वरवट बकाल, लाडणापूर, सोनाळा, वानखेड, शेगाव, जलंब, जळगाव जामोद, सुनगाव, पिंपळगाव काळे, चारठाणा, मोताळा, मासरुळ, चिखली, अकोला जिल्हयात दानापूर, वारखेड, सोनवाडी, हिवरखेड, खंडाळा, अडगाव बुद्रूक, खुर्द, अमरावती जिल्ह्यात अंजनगाव सूर्जी, पांढरी, अचलपूर, शिरजगाव, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड अशा विविध गावांमध्ये पानमळे व पानपिंपरीचे उत्पादन घेतले जाते. या दोन्ही वेलवर्गीय पिकांवर दरवर्षी विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. सर्व भागांत ५०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर त्याचे उत्पादन केले जाते. या पानांना मोठी मागणी असून देशभर त्याची विक्री केली जाते.

शेतकरी स्वमालकीच्या तसेच भाडेपट्ट्याने शेती करून त्यावर पानपिंपरीची लागवड करतात. गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, किडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे या पिकाचे नुकसान होत आहे. मात्र, कृषी विभाग, कृषी विद्यापीठाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. कुठलेही मार्गदर्शन केले जात नाही.

मागील दोन-तीन वर्षात झालेल्या नुकसानामुळे आठ पानपिंपरी उत्पादकांनी आत्महत्यासुद्धा केल्या. आयुष मंत्रालयाकडून पानपिंपरीला अनुदान देय आहे. परंतु औषधी वनस्पती मंडळ व कृषी विभागाच्या अनुदान वाटपाच्या किचकट पद्धतीनेमुळे अनेक शेतकरी अनुदानापासून दूरच आहेत.     या आहेत मागण्या

  • पानपिंपरी व विड्याचे पान पेरेपत्रकातील पिकांच्या यादीत समाविष्ट करावे.
  • पानमळा व पानपिंपरी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा.
  • या पिकास देय असलेले अनुदान वितरणाची प्रक्रिया सुटसुटीत करावी.
  • पीक साठवणूक, वाळवणी, प्रतवारी, पॅकेजिंग यासाठी वरवट बकाल, जळगाव जामोद, अकोट, अंजनगाव सूर्जी या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात.
  • या पिकांची कृषी विभागाकडून जिओ टॅगिंग केले जावे.
  • दिवठाणा येथील संशोधन केंद्राला पुरेसा कर्मचारी वर्ग, निधी देऊन या पिकांच्या संशोधनाचे काम पुढे नेले जावे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

    Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

    Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

    Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

    Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

    SCROLL FOR NEXT