संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९ हजारांवर तक्रारी

टीम अॅग्रोवन

परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे उगवण कमी झाली. याप्रकरणी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून तक्रारींचा पाऊस पडत आहे. मंगळवारपर्यंत (ता.७) या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी २९ हजार ३५२ तक्रारी कृषी विभागाकडे दाखल केल्या. या तक्रारींनुसार सोयाबीन बियाण्यांची उगवण कमी झालेले क्षेत्र २८ ते ३० हजार असण्याचा अंदाज आहे. दरम्यान, निकृष्ट बियाणेप्रकरणी या तीन जिल्ह्यांत बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध  गुन्हे दाखल करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

या वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील, खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे विकत घेऊन पेरणी केली; परंतु पेरणीनंतर सोयाबीन निकृष्ट बियाण्यांची उगवण कमी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. या तीन जिल्ह्यांत सहा लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. एकीकडे कृषी विभागाच्या पथकांमार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत; तर दुसरीकडे शेतकऱ्यांकडून तक्रारींचा ओघ सुरूच आहे. ६० ते ७० टक्के पंचनामे झाले आहेत.

संपूर्ण पंचनामे झाल्यानंतरच बाधित क्षेत्र स्पष्ट होईल. ‘महाबीज’कडून काही शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले; परंतु खासगी कंपन्यांकड़ून अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नाही. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना भरीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संघटनांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT