दूध दरवाढीच्या मागणीसाठी आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या नेतृत्वाखाली जिंतूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन बंद आंदोलन

टीम अॅग्रोवन

परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१) जिल्ह्यात विविध ठिकाणी रास्ता रोको तसेच दूध संकलन बंद आंदोलन करण्यात आले.

‘कोरोना’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध उत्पादकांच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान मिळावे आणि गायीच्या दुधाचा खरेदी दर ३० रुपये प्रति लिटर करावा, या मागण्यांसाठी जिंतूर येथे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्या चौधरी, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, सचिन गोरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पंडित दराडे, गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, लक्ष्मण बुधवंत,अशोक बुधवंत, सुयोग मुंडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

परभणी येथील उड्डाण पुलावर भाजप महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखालील रास्ता रोको आंदोलनात सुरेश भुमरे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथे दूध संकलन बंद करण्यात आले. बाबासाहेब जामगे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उद्धव नाईक, उमेश देशमुख आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. परभणी आणि पूर्णा तालुक्यात ३ ठिकाणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड आदी तालुक्यांत मिळून १४ ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सेलू, डिग्रस जहांगीर येथे एल्गार आंदोलन अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे शनिवारी (ता.१) सेलू आणि डिग्रस जहांगीर येथे दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री महादेवाच्या पिंडींवर दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध करण्यात आला.

दुधाला प्रतिलिटर ३० रुपये भाव तसेच प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आंदोलनात कॉ. रामेश्वर पौळ, उद्धव पौळ, रामकृष्ण शेरे पाटील, दत्तुसिंग ठाकूर सांगतानी, विकास पौळ, शिवाजी पौळ,धोंडिबा पातळे, रत्नेश्वर पौळ, माणिक पौळ, शिवाजी शेरे, विष्णू शेरे पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT