Data of Farmers in the State Awaits Correction 
मुख्य बातम्या

८.५३ लाख शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

राज्यामध्ये अद्यापही ८ लाख ५३ हजार शेतकरी डाटा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PMKisan) लाभ मिळालाच नाही.

टीम अॅग्रोवन

राज्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये (PMKisan) ८.५३ लाख शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्तीच्या (Correction) प्रतीक्षेत असून यामुळे या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. या प्रकारामुळे केंद्र शासनाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PMKisan) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतलाय. सन २०१९ पासून राबविण्यात येणाऱ्या  या योजनेमध्ये राज्यात १ कोटी १४ लाख ९३ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलीय.  मात्र, त्यापैकी १ कोटी ९ लाख ३३ हजार पात्र  शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत आहे. योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८,१२० कोटी रुपयांची मदत जमा करण्यात आलीय. 

दरम्यान राज्यामध्ये अद्यापही ८ लाख ५३ हजार शेतकरी डाटा दुरुस्तीच्या (Correction) प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा  (PMKisan) लाभ मिळालाच नाही.

विशेष म्हणजे या शेतकऱ्यांची डाटा दुरुस्ती  (Correction) करून घेण्याबाबत केंद्र शासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्यानंतर ही सदरील काम रखडली आहेत. 

व्हिडीओ पहा- 

त्यानंतर राज्य शासनाने (State Government) तसेच राज्याच्या कृषी आयुक्त (Agriculture Commissioner)  कार्यालयाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी (District Collector) कार्यालयांना पत्र पाठवले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या डाटा दुरूस्तीसाठी (Correction) गाव पातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना या पत्राद्वारे दिल्या आहे.

डाटा दुरुस्तीसाठी २५ मार्चला शिबिर

आयुक्त कार्यालयाच्या या पत्रानुसार राज्यात मार्च महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी म्हणजेच २५ मार्च रोजी गाव पातळीवर डाटा दुरुस्तीचे (Correction) काम करण्यासाठी शिबिर आयोजित केले जाणार आहे. सदरील काम संपूर्ण शेतकऱ्यांचा डाटा दुरुस्ती होईपर्यंत सुरू ठेवावे, असेही या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Subsidy for Equipment: पन्नास टक्के अनुदानावर पंप, रोटाव्हेटर, कडबाकुट्टी

Solapur Water Shortage: सोलापुरात टंचाई निवारणासाठी ९.६७ कोटींचा कृती आराखडा

Drought Compensation: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या : राष्ट्रवादी

Rabi Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे बियाणे १०० टक्के अनुदानावर

Fisheries Business: मत्स्य व्यवसाय विकासासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना

SCROLL FOR NEXT