मिरज येथील जवावरांच्या बाजारात बुधवारी (ता. १३) संकरित गायींची झालेली आवक
मिरज येथील जवावरांच्या बाजारात बुधवारी (ता. १३) संकरित गायींची झालेली आवक 
मुख्य बातम्या

दुधानंतर आता गायींचे दर घसरले

Abhijeet Dake

सांगली : गाईच्या दुधाला दर मिळत नसल्याने मागणी कमी झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहे. जनावरं दावणीला सांभाळणं दिवसेंदिवस अवघड होत आहे. परिणामी मिरज येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी संकरित गायींची संख्या वाढली आहे. याचा परिणाम गायींच्या दरावर झाला आहे. एरवी गाई ७० हजार ते ८० हजार रुपयांना खरेदी केली जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सुमारे २५ ते ३० हजार पर्यंत दर आले असून ४० ते ५० हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. तसचे गाई खरेदीकडेरी पशुपालकांनी पाठ फिरवली आहे. मिरज येथील जनावरांचा बाजार हा राज्यात गायींसाठी प्रसिद्ध आहे. या बाजाराची उलाढाल कोट्यवधींची आहे. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गाईच्या दुधाच्या दराचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे गाई दावणीला सांभाळण कठीण होत चालले आहे. गाई विक्रीशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मिरज येथे दर बुधवारी जनावरांचा बाजार भरतो. गेल्या दोन महिन्यांपासून संकरित गायींच्या आवक वाढली आहे. मात्र, गाईला दर मिळत नसल्याने गायींची खरेदी ठप्प झाली आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच इतकी गंभीर स्थिती ओढवल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  गाईचे दूध स्वीकारण्यास दूध संघांनी नकार दिल्याने त्यांना बाजाराची वाट दाखवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. संकरित गायींची आवक मोठ्या प्रमाणात झाली; पण ग्राहक फिरकले नाहीत. त्यांच्या वाहतुकीचाही खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडला. किंमती वीस ते तीस टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  कडेगाव, शिरोळ, इस्लामपूर, कराड, जत, तासगाव, अथणी, कागवाड इत्यादी भागातून शेतकरी संकरीत गाई विक्रीसाठी घेऊन आले होते. दीड महिन्यापासून गायींची आवक वाढली असून मागणी कमी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गाईच्या दुधाला तसेच गायींना मागणी असते; यंदा मात्र परिस्थिती वेगळी निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. मिरज येथील यशामराव बंडूजी पाटील दुय्यम बाजारातील गायींचे झालेले व्यवहार            

महिना  आवक    विक्री  सरासरी दर   उलाढाल
२०१७        
एप्रिल  ४३०  २००  ७० हजार  १ कोटी २४ लाख
मे     ८२५    ३००  ७० हजार  १ कोटी ७४ लाख
२०१८        
एप्रिल    ५५० १५९      ४० हजार  ६८ लाख ३७ हजार
मे  ६२०       १६८    ४५ हजार    ६७ लाख २० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT