कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍यूआर कोड’
कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍यूआर कोड’ 
मुख्य बातम्या

कापूस बियाणे सत्यता पडताळण्यासाठी ‘क्‍यूआर कोड’

टीम अॅग्रोवन

जळगाव ः बोगस कापूस बियाण्याला आळा घालण्यासह बियाण्याची सत्यता पडताळण्यासाठी एका कापूस बियाणे उत्पादक कंपनीने क्‍यूआर कोड हे तंत्रज्ञान आणले आहे. ॲण्ड्रॉईड व बिगर ॲण्ड्रॉईड मोबाईल वापरणारे शेतकरी संबंधित कंपनीच्या बियाण्याची सत्यता एका क्षणात आपल्या मोबाईलवर बियाणे खरेदीनंतर करू शकतात.  हे तंत्रज्ञान बोगस बियाण्याला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरत असून, त्याचा व्यापक स्वरूपात उपयोग केला जायला हवा, असे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने म्हटले आहे.  संबंधित कंपनीच्या कापूस बियाण्याच्या पाकिटावर क्‍यूआर १० आकडी कोड नमूद आहे. याच कोडच्या वरच्या बाजूला एक मोबाईल क्रमांक असून, क्रॅश केल्यानंतर जो कोड दिसतो, तो संबंधित मोबाईल क्रमांकावर एसएमएसने पाठवायचा आहे. संदेश पाठविल्यानंतर लागलीच संबंधित कंपनीकडून खरेदी केलेले कापूस बियाणे खात्रीलायक आहे, याचा संदेश येतो. हा संदेश आला नाही तर बियाणे खात्रीलायक नाही, असे गृहीत धरले जाते.  ज्यांच्याकडे ॲण्ड्रॉईड मोबाईल आहे, त्यांना आपल्या मोबाईलमध्ये संबंधित कंपनीचे ॲप डाऊनलोड करून घ्यावे लागते. या ॲपमध्ये बायाण्याच्या पाकिटावरील कोड स्कॅन करून तो पाठवावा लागतो. या कोड पाठविल्यानंतर लागलीच संबंधित ॲपवर एक संदेश येतो. त्यात बियाणे प्रमाणित किंवा खात्रीलायक असल्याचे नमूद असतो. बोगस बियाणे ओळखण्यासह शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगाचे आहे. यामुळे यंदा संबंधित कंपनीच्या बियाण्याचा काळाबाजार होणार नाही, असा दावा असा दावा कृषी विभागाने केला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT