कोथळी, जि. बुलडाणा ः येथे प्रकाश जुनारे यांनी लागवड केलेल्या कपाशीच्या पानांवर अशा अळ्या दिसून येत आहेत.
कोथळी, जि. बुलडाणा ः येथे प्रकाश जुनारे यांनी लागवड केलेल्या कपाशीच्या पानांवर अशा अळ्या दिसून येत आहेत.  
मुख्य बातम्या

कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन

अकोला ः या हंगामात मेअखेर तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेली कपाशी दोन ते चार पानांची झालेली आहे. ठिकठिकाणी या पिकात आंतरमशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. हंगाम चांगला राहील, अशी आशा असतानाच बीटी कपाशीच्या पिकावर अळी व अंडी आढळून येत आहेत. यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरवातीलाच चिंतातुर झाला आहे. वऱ्हाडात सोयाबीननंतर कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असते. असमतोल पावसामुळे आतापर्यंत सार्वत्रिक पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वमॉन्सून कपाशीची लागवड केली आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर तर अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट या तालुक्‍यांमध्ये कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. कपाशीचे हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मागील आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने याचा फायदा पिकाला होत आहे. पीकवाढीच्या स्थितीत असतानाच आता कपाशीच्या पानांवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या हंगामात शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पार उद्ध्वस्त झाला होता. हंगामात कपाशीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. यामुळे चालू हंगामात कपाशीचे लागवड क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त झाला होता. या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी खाते, कृषी विद्यापीठाने जनजागृती केली. जैविक पद्धतीने अळीचे निर्मूलन करण्याचा सल्ला देण्यात आला. एकीकडे अशी सल्ले दिले जात असताना आता हंगामाच्या अगदी सुरवातीलाच कपाशीच्या पिकावर अळ्या दिसून येत आहेत. ही अळी नेमकी कोणती, तिच्या निर्मूलनासाठी काय उपाययोजना कराव्यात, असे प्रश्‍न शेतकऱ्यांना पडत आहेत.  मोताळा तालुक्‍यातील कोथळी येथील श्‍याम प्रकाश जुनारे यांनी आठ एकरात १० जूनला बीटी कपाशीची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतातील कपाशीचे झाड दोन ते तीन पानांचे आहे. मात्र, या कपाशीच्या प्रत्येक पानांवर सर्वत्र दोन ते तीन अळ्या तसेच अंडी दिलेली दिसून येत आहेत. सध्या ढगाळ वातावरणामुळे किडीत वाढीची शक्‍यता असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT