सहकारी बॅंकांची नोकरभरती ऑनलाइन करण्याचे आदेश
सहकारी बॅंकांची नोकरभरती ऑनलाइन करण्याचे आदेश 
मुख्य बातम्या

सहकारी बॅंकांची नोकरभरती ऑनलाइन करण्याचे आदेश

टीम अॅग्रोवन

मुंबई ः राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती यापुढे ऑनलाइन करण्याचे आदेश सहकार विभागाने शासन निर्णयाद्वारे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी बॅंकांमध्ये होणाऱ्या नोकरभरतीतील गैरप्रकार थांबण्याची अपेक्षा सहकार विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील राज्य सहकारी बॅंक या शिखर बॅंकेसह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये होणारी भरती ऑफलाइन पद्धतीने होत होती. भरतीत गैरव्यवहाराच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले, तसेच ही भरतीप्रक्रिया प्रामाणिक व निष्पक्षपातीपणे, तसेच पारदर्शकरीत्या होत नसल्याचे प्राथमिक चौकशीअंती आढळून आल्याने जनतेच्या ठेवींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता राज्यातील सहकारी बॅंकांमध्ये होणारी नोकरभरतीची प्रक्रिया ऑनलाइन करावी, तसेच ही सर्व प्रक्रिया त्रयस्थ संस्थेमार्फत राबवावी, असा आदेश सहकार विभागाने शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केला आहे. नाबार्डच्या फेरमूल्यांकन समितीने नाबार्डकडे या संदर्भात पाठवलेल्या अहवालात बॅकिंग क्षेत्रातील बदल, तांत्रिकदृष्ट्या कुशल अधिकाऱ्यांची आवश्यकता, तसेच सद्यःस्थितीच्या स्पर्धात्मक बॅकिंग व्यवसायात बॅकिंगचा आत्मा असलेला गुणवत्तापूर्ण सेवकवर्ग बँकांमध्ये भरती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यासाठी सर्व जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये कामकाज कार्यक्षम आणि अविवादित पद्धतीने हाताळण्यासाठी ऑफलाइनऐवजी ऑनलाइन भरतीप्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बॅंकांना सूचना देण्यात येत असून, त्यांनी यापुढे भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी मान्यताप्राप्त ऑनलाइन भरतीप्रक्रिया राबवणाऱ्या क्षमता अनुभव आणि विश्वासार्हता असणाऱ्या संस्थेची नियुक्ती करावी. या संस्थेला किमान पाच राष्ट्रीयीकृत बॅंका अथवा संस्थांमधील भरतीप्रक्रियेचा अनुभव असावा. या संस्था काळ्या यादीतील अथवा कोणतेही आरोप अथवा गुन्हे दाखल झालेल्या नसाव्यात. जिल्ह्याच्या ठिकाणी एकाचवेळी परीक्षा घेणे शक्य नसल्यास विविध टप्प्यांत परीक्षा घेताना परीक्षेची काठीण्य पातळी समान ठेवण्याची क्षमता असलेली संस्था असावी. ही संस्था निवड करण्याची जबाबदारी बॅंकेच्या संचालकांची राहील. तसेच, या संस्थेने कोणताही गैरप्रकार करू नये, तसेच काही आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याची जबाबदारीही बँकेचीच राहील असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.  बँकेने नमूद केल्याप्रमाणे जाहिरात देण्यापासून ते अंतिम निवड यादीपर्यंत भरतीची सर्व प्रक्रिया  ऑनलाइनच करण्यात यावी. लेखी आणि मौखिक परीक्षेचे गुणांचे प्रमाण हे ९०:१० असे असावे. संस्थेने परीक्षा पार पडल्यावर उत्तरतालिका लगेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. परीक्षेसंदर्भातील सर्व कादगपत्रे संस्थेने सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपीच्या माध्यमातून किमान दोन वर्षे जतन करावीत. सहकारी बॅंकांच्या यापुढील सर्व भरतीप्रक्रियेसाठी ही पद्धती राबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, जी सहकारी बॅंक या निर्देशांचे पालन करणार नाही त्यांच्यावर निबंधक, किंवा विभागीय सहनिबंधक यांनी उचित कारवाई करावी, असा इशाराही सहकार विभागाने या शासन निर्णयाद्वारे दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT