लीड बँक व्यवस्थापकांचा सत्कार करताना समर्थ संघटनेचे पदाधिकारी.
लीड बँक व्यवस्थापकांचा सत्कार करताना समर्थ संघटनेचे पदाधिकारी. 
मुख्य बातम्या

पीककर्ज वाटप होत नसल्याने लीड बँक व्यवस्थापकांचा सत्कार !

टीम अॅग्रोवन

अकोला ः खरीप हंगाम तोंडावर अालेला असतानाही पीककर्ज वाटप होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले अाहेत. याचा निषेध म्हणून मंगळवारी (ता. १२) अकोल्यातील समर्थ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लीड बँक मॅनेजरला निवेदन देत पुष्पहार घालून त्यांचा प्रतिकात्मक सत्कार केला.  याबाबत संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले, की जिल्ह्यात शेती मशागतीची कामे पूर्ण झाली असून पेरण्या तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांकडे पैसा नाही. कृषी राज्यमंत्री खोत यांनी घेतलेल्या अाढावा बैठकीत पीककर्ज वाटपाबाबत नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी संकटात असतानादेखील बँका त्यांना पीक कर्जपुरवठा करण्यास टाळाटाळ करीत आहे.  शासनाचे व बँक अधिकाऱ्यांचे डोळे उघडावे, याविषयाचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी समर्थ संघटनेचे अध्यक्ष संगम मोहोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी लीड बँकेचे कार्यालय गाठून अधिकाऱ्याला शाल, श्रीफळ दिले. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप न केल्यास यापेक्षाही मोठा सत्कार करून निषेध करण्याचा इशारा संघटनेने दिला. या वेळी संघटनेचे बाळासाहेब ठाकरे, सचिन बोनगिरे, अाकाश सिरसाट, श्रीराम टाले, प्रणव बासोडे, सचिन हागे, रवि बैस, सुनिल गणवीर, गोपाल बंड, सुनील दाेत, चक्रधर काळे यांच्यासह इतर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT