कोल्हापूर : संततधार पावसामुळे मंगळवारी (ता. २६) कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला.
कोल्हापूर : संततधार पावसामुळे मंगळवारी (ता. २६) कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. 
मुख्य बातम्या

कोकण, घाटमाथ्यावर दमदार

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात मॉन्सूनचे पुनरागमन झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात दणक्यात पाऊस पडला. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यातील रतनवाडी येथे उच्चांकी ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पालघर, रायगड, ठाण्यातही मुसळधार पाऊस कोसळला. सह्याद्रीचा घाटमाथा आणि पूर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला. कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला, तर जळगावतील हतनूर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. रविवारी आणि सोमवारी कोकणातील पालघर, रायगड, ठाणे जिल्‍ह्यांत मुसळधार, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडला. पावसाचा जोर अधिक असल्याने सर्वत्र पाणी भरून जमीन खचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर घाटमाथ्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, नगर, सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात पावसाने दमदार बरसात केली.  डोंगरांवरील धबधबे, झरे वाहू लागल्याने नद्या, नाल्यांना पूर येऊन धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली, तर नगर मधील घाटघर धरण भरले आहे. मुळा नदी दुथडी भरून वाहिल्याने कोतूळ येथील पूल पाण्याखाली गेला होता. तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगळवारी (ता. २६) सकाळपासून पावसाच्या सरीवर सरी येत असल्या तरी पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले.  मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - हवामान विभाग) :  कोकण : विक्रमगड १९०, जव्हार, लांजा, पालघर, तलासरी प्रत्येकी १७०, माथेरान १६०, डहाणू, उल्हासनगर, वाडा प्रत्येकी १५०, कर्जत, महाड, मोखडा, संगमेश्‍वर, शहापूर प्रत्येकी १४०, अंबरनाथ, ठाणे प्रत्येकी १३०, भिरा, कल्याण, माणगाव, पोलादपूर प्रत्येकी १२०, पनवेल, वैभववाडी प्रत्येकी ११०, म्हसळा १००, बेलापूर, भिवंडी, वसई प्रत्येकी ९०, खालापूर, मंडणगड, सोहा प्रत्येकी ८०, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी प्रत्येकी ७०, उरण ६०, कणकवली, खेड, मडगाव, सांताक्रुज, मुरूड, पेन, सांगे प्रत्येकी ५०. मध्य महाराष्ट्र : महाबळेश्‍वर १७०, ओझरखेडा, राधानगरी प्रत्येकी १४०, पेठ १३०, इगतपुरी १२०, हर्सुल, त्र्यंबकेश्‍वर प्रत्येकी ११०, गगनबावडा १००, अकोले, लाेणावळा प्रत्येकी ९०, चंदगड ८०, कळवण ७०, साक्री, शाहूवाडी, वेल्हे प्रत्येकी ६०, आंबेगाव, गारगोटी, ओझर, पाटण, पौड, मुळशी, शिराळा प्रत्येकी ५०. अजरा, जामनेर, कागल, कोल्हापूर, मालेगाव, नवापूर ४०.  

घाटमाथा : ताम्हिणी १५०, दावडी १४०, डुंगरवाडी, भिवपुरी प्रत्येकी १३०, शिरगाव १२०, कोयना पोफळी ११०, आंबोणे १००, खोपोली, खंद, धारावी प्रत्येकी ९०, वाणगाव, वळवण, शिरोटा प्रत्येकी ८०, कोयना नवजा, ठाकूरवाडी प्रत्येकी ६०.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव : भातसा १५०, अप्पर वैतरणा १३०, मध्य वैतरणा, तानसा प्रत्यकी १२०, तुलसी १००, विहार ९०.  कोकण, मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार? कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अाज (ता. २७) तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारपर्यंत (ता. ३०) कोकणात जोरदार पावसाचा अंदाज असून, शनिवारी मध्य महाराष्ट्रात जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात अद्यापही पावसाने जोर धरलेला नसून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. 

बिहार, झारखंडमध्ये मॉन्सूनची वाटचाल नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) पूर्व भारतील वाटचाल सुरू ठेवत मंगळवारी (ता. २६) संपूर्ण पश्‍चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंडचा बहुतांशी भाग व्यापला आहे. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने शुक्रवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र, ओडिशा, झारखंड, बिहार राज्य व्यापणार असून, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तराखंडच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. ३०) राजस्थान, दिल्लीसह वायव्य भारतातील बहुतांशी भागात मॉन्सून पोचणे शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

  •  पालघर, रायगड,  ठाण्यात मुसळधार
  •  घाटमाथा, सह्याद्रीच्या पूर्व भागात जोर
  •  नद्यांना पूर, धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
  •  कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली
  •  हतूनर धरणाचे दरवाजे उघडले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

    Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

    SCROLL FOR NEXT