गजानन महाराज पालखी
गजानन महाराज पालखी 
मुख्य बातम्या

‘श्रीं’ची पालखी मंगळवारी होणार पंढरपूरसाठी मार्गस्थ

टीम अॅग्रोवन

शेगाव, जि. बुलडाणा ः पंढरपूर येथील अाषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानची पालखी मंगळवारी (ता. १९) मार्गस्थ होत अाहे. श्री संत गजानन महाराजांचा पालखी सकाळी ७ वाजता संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर सुरू होईल. पालखीसोबत हत्ती, घोडा, वारकरी, भजनी दिंड्या राहणार असून, सकाळी श्री क्षेत्र नागझरीकडे रवाना होईल. पालखीचे नियोजन २० जून - गायगाव, रात्री मुक्काम भौरद, २१ व २२ जून - अकोला, २३ जून - भरतपूर, रात्री मुक्काम वाडेगाव, २४ जून - रात्री मुक्काम पातूर, २५ जून - मेडशी, मुक्काम डव्हा, २६ जून - मालेगाव, मुक्काम शिरपूर जैन, २७ जून - चिंचाबा पेन, मुक्काम म्हसला पेन, २८ जून - किनखेडा, मुक्काम रिसोड, २९ जून - पान कन्हेरगाव, मुक्काम सेनगाव, ३० जून - श्रीक्षेत्र नरसी (नामदेव), मुक्काम डिग्रस, १ जुलै - श्री क्षेत्र औंढा नागनाथ, मुक्काम जवळा बाजार, २ जुलै - अडगाव रंजोबा - हट्टा, मुक्काम श्रीक्षेत्र त्रिधारा, ३ जुलै - परभणी, ४ जुलै - ब्राह्मणगाव, मुक्काम दैठणा, ५ जुलै - खळी, मुक्काम गंगाखेड, ६ जुलै - वडगाव (दादाहरी), मुक्काम परळी (थर्मल), ७ जुलै - परळी, मुक्काम परळी वैजनाथ, ८ जुलै - कन्हेरवाडी, मुक्काम अंबेजोगाई, ९ जुलै - लोखंडी सावरगाव, मुक्काम बोरी सावरगाव, १० जुलै - गोटेगाव, मुक्काम कळंब, ११ जुलै- गोविंदपूर, मुक्काम तेरणा साखर कारखाना, १२ जुलै - किनी, मुक्काम उपळा(माकडाचे), १३ जुलै - संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर (उस्मानाबाद), १४ जुलै - वडगाव सिद्धेश्वर, मुक्काम श्रीक्षेत्र तुळजापूर, १५ जुलै - सांगवी, मुक्काम उळे, १६ जुलै - सोलापूर, १७ जुलै - सोलापूर, १८ जुलै - सोलापूर, मुक्काम तिऱ्हे, १९ जुलै - कामती खु. (वाघोली), मुक्काम माचणूर, २० जुलै - ब्रह्मपुरी, मुक्काम श्रीक्षेत्र मंगळवेढा, २१ जुलै - श्रीक्षेत्र मंगळवेढा व रात्री श्रीक्षेत्र पंढरपूर येथे यात्रा काळात मुक्काम राहील. पालखीचा परतीचा प्रवास २७ जुलैला सुरू होणार अाहे. मजल दरमजल करीत पालखी १७ अाॅगस्टला संतनगरी शेगावमध्ये दाखल होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT