श्री संत गजानन महाराज यांची पालखी मंगळवारी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
श्री संत गजानन महाराज यांची पालखी मंगळवारी आषाढी सोहळ्यासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. 
मुख्य बातम्या

'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...

टीम अॅग्रोवन

शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे पायदळ दिंडीसह मंगळवारी (ता. १९) सकाळी शेगाव येथून विठ्ठलनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. गेली ५० वर्षे ही पालखी आषाढीच्या सोहळ्यात सहभागी होत आली आहे. श्री संत गजानन महाराजांचा जयजयकार करीत टाळ मृदंगाच्या गजरात, अश्व, गज, रथ, मेना, भालदार, चोपदार, अशा राजवैभवी थाटात या पायदळ वारीत टाळकरी, पताकाधारी वारकरी सहभागी झाले आहेत. पालखी श्रींच्या प्रकटस्थळी आल्यानंतर तेथे आरती करण्यात आली. टाळ मृदंगाचा निनाद, पावल्या खेळताना टाळकऱ्यांच्या ‘गण गण गणात बोते'च्या गजराने शहरात मंगलमय वातावरण पसरले होते. सकाळी मंदिरात सुशोभित राजसिंहासनावर श्रींचा रजत मुखवटा ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात विराजमान झाल्यानंतर संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर संस्थानचे कार्यकारी विश्‍वस्त निळकंठदादा पाटील यांनी पजूा केली. तसेच या वेळी संस्थांनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत सोहळा श्रींचे प्रगटस्थळ येथे झाला. श्रींच्या पालखी समवेत वारकऱ्यांना फराळ व नागझरी रोडलगत अशोकराव देशमुख यांच्या वतीने चहापान देण्यात आले. संत नगरीतून निघालेल्या पालखीचे पहिले स्वागत श्री क्षेत्र नागझरी येथे श्री गोमाजी महाराज संस्थानच्या वतीने झाले. या वेळी संस्थानतर्फे वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT