कृषी बाजार
कृषी बाजार 
मुख्य बातम्या

कृषी बाजार पायाभूत निधी योजना लवकरच सुरू होणार

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील शेतमाल बाजार व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी सध्याच्या बाजार समित्यांना वगळून नवी बाजार व्यवस्था उभारण्यास केंद्र सरकारने निधी दिला आहे. तथापि, राज्य शासनाचा होकार येताच मार्गदर्शक सूचना जारी होतील, अशी माहिती नाबार्डच्या सूत्रांनी दिली.  राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी एका बाजूला जोरदार प्रयत्न सुरू होत आहेत. मात्र, सध्याची बाजार व्यवस्था अपूर्ण असून, त्यातील काही अनिष्ठ प्रथांवर तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या घटकांवर कारवाई किंवा पर्याय सुचविल्यास या घटकांकडून जोरदार विरोध होतो. त्यामुळेच नवी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न शासन करणार आहे.  बाजार व्यवस्था मजबूत करण्यासाठी सध्याच्या बाजार समित्यांना ऑनलाइन सुविधांसाठी ७० लाखांचा निधी मिळणार आहे. त्यात राज्यातील ३५ समित्या असून, ही संख्या पुढे ७० पर्यंत जाईल. मात्र, या समित्यांना वगळून गावपातळीपर्यंत पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी दोन हजार कोटींचा निधी मिळाला आहे. त्याची नियमावली तयार  करण्याचे काम सुरू असून, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे नाबार्डच्या उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.  वैशिष्ट्ये : 

  • ई-नाम असतानाही नवी योजना कशासाठी?
  • सध्याच्या बाजार समित्यांसाठी ई-नाम ही योजना आहे. मात्र, नवी योजना पायाभूत सुविधायुक्त व दलालमुक्त असेल.
  • नव्या योजनेचे नाव काय असेल?
  • कृषी बाजार पायाभूत निधी योजना 
  • पहिल्या टप्प्यात किती निधी खर्च होणार?
  • दोन हजार कोटी रुपये 
  • देशात किती बाजार तयार करण्याचा प्रयत्न होईल?
  • २२ हजार ठिकाणी बाजार सुविधा मिळतील 
  • यामुळे सध्याच्या बाजार समित्यांचे काय?
  • सध्याच्या बाजार समित्यांची कामे आहे तशीच चालतील, मात्र नवे बाजार दलालमुक्त असतील. 
  • नव्या बाजार व्यवस्थेत नाबार्ड काय करणार?
  • नव्या बाजारांसाठी अल्पव्याजात नाबार्ड कर्ज देईल. मात्र, त्यासाठी राज्य शासनाने हमी दिली  पाहिजे. 
  • योजना कुठे अडली आहे?
  • या योजनेला राज्य शासनाची अद्याप मान्यता नाही. मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) तयार नाहीत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT