कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची कार्यवाही सुरू
कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची कार्यवाही सुरू  
मुख्य बातम्या

कांदा व्यापाऱ्यांच्या साठा तपासणीची कार्यवाही सुरू

टीम अॅग्रोवन

नाशिक  : कांदा दराने मोठी उसळी घेतल्याने व बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण पडल्याने कांदासाठ्याची तपासणी करून दररोज शासनास साठा अहवाल पाठविण्याच्या सूचना निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी तालुक्यातील महसूल मंडल अधिकारी यांना दिले आहेत. बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदीनंतर साठा तपासणीत जर शासनाच्या अधिसूचनेनुसार मर्यादेपेक्षा अधिक साठा आढळल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  केंद्राच्या अन्न नागरीपुरवठा व ग्राहक मंत्रालयाने शुक्रवार (ता. ६) आदेश जारी करून कांदासाठा तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, जिल्हा पुरवठा विभागाचे पी. टी. महाजन यांनी लासलगाव परिसरात स्थानिक महसूल मंडल निरीक्षक व तलाठी यांच्यासोबत साठा तपासणी केली. शासनाने यापूर्वीच थेट आदेश देत रविवार (ता. ३) साठवणुकीवर असलेली मर्यादा घटविली आहे. राज्यांमधील कांद्याच्या घाऊक व्यापाऱ्यांना २५ टन तर किरकोळ विक्रेत्यांना पाच टनांपेक्षा जास्त कांद्याचा साठा ठेवता येणार नाही. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना तालुक्यातील कांदा साठा तपासणी दररोज करून अद्ययावत साठा माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांनी निफाड तालुक्यातील महसूल मंडल निरीक्षक यांनी कांदा साठवणुकीची सविस्तर माहिती अहवालात देण्याचे व अतिरिक्त साठा दिसल्यास लागलीच जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याचे अधिकार दिले आहेत. तहसीलदार श्री. पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसंवत, विंचूर, निफाड, सायखेडा यांसह खेरवाडी भागातही ही तपासणी त्या-त्या स्थानिक महसूल मंडळ निरीक्षक यांना दररोज तपासणी करून चाळींमध्ये उपलब्ध कांद्याची नोंद, तसेच सर्व बाजार समित्यांनी कांदा आवक, विक्री आणि शिल्लक साठ्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच अतिरिक्त साठा दिसला तर लागलीच स्थानिक पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल पाठवावा लागणार आहे. सहकार खातेही ''दक्ष''  लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यक्षेत्रातील कांदा व्यापाऱ्यांच्या कांदा खळ्यावर किती कांदा आहे? व शासनाने निर्धारित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक साठा आहे का? याबाबत निफाड येथील सहकार खात्याचे सहायक निबंधक अभिजित देशपांडे यांच्या विशेष पथकाने अचानक पाहणी करून तपासणी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT