खानदेशात पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा
खानदेशात पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

खानदेशात पणन महासंघाची कापूस खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः खानदेशात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे कापूस खरेदी अजूनही सुरू झालेली नाही. पुढील आठवड्यात खरेदी सुरू होईल, असे संकेत पणन संचालक संजय पवार यांनी ॲग्रोवनशी बोलताना दिले.  महासंघा भारतीय कापूस महामंडळाचा (सीसीआय) एजंट म्हणून कापसाची खरेदी खानदेशात करणार आहे. ही खरेदी नाशिक जिल्ह्यातील मालेगावसह जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, अमळनेर, पारोळा, भडगाव येथे  केली जाणार आहे. कापसाला ५५५० व ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जाईल. १२ ते १३ टक्‍क्‍यांच्या आर्द्रतेच्या कापसाला क्विंटलमागे २२० रुपये कमी दर दिला जाईल. शेतकऱ्यांना अधिक आर्द्रतेच्या कापसासाठी किमान ५२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर या केंद्रात मिळू शकेल, असे संचालक पवार म्हणाले.  सीसीआयतर्फे खानदेशात नंदुरबारमध्ये नंदुरबार, धुळ्यातील शिरपूर, जळगाव जिल्ह्यात जळगाव, पाचोरा, भुसावळ, शेंदूर्णी (ता. जामनेर), जामनेर, एरंडोल आदी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. या केंद्रांमध्ये मिळून सुमारे २० हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सीसीआयने मध्यंतरी शिरपूर येथील केंद्र अधिक आर्द्रतेचा कापूस येत असल्याने बंद केले होते. हे केंद्र पुन्हा एकदा सुरू झाले आहे. सध्या दर्जेदार कापूस केंद्रात विक्रीसाठी येत असल्याचे सांगण्यात आले. 

कापसाला बोनस द्या शेतकऱ्यांनी कापसाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना करू नये. पणनच्या केंद्रात कापसाची विक्री करावी. शासनाने कापसाला प्रतिक्विंटल एक हजार रुपये बोनस द्यावा. शेतकऱ्यांचे यंदा अतिपावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना मदत केली पाहिजे, असे पणन संचालक संजय पवार म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT