दुष्काळग्रस्त अकोट, पातूर तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित
दुष्काळग्रस्त अकोट, पातूर तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित 
मुख्य बातम्या

दुष्काळग्रस्त अकोट, पातूर तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित

टीम अॅग्रोवन

अकोला  : मागिल २०१८ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ घोषित करून ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीची घोषणा करण्यात आली होती. या तालुक्यातून अकोट व पातूर तालुक्याला वगळण्यात आले होते. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दबावानंतर शासनाने दुसऱ्या टप्प्यात दुष्काळग्रस्त म्हणून अकोट, पातूर तालुके घोषित केले होते. मात्र, या तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी अद्यापही मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. यात दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सन २०१८ च्या खरीप हंगामात शासनाने दुष्काळ घोषित केला. या वेळी जिल्ह्यातील पैसेवारीवरून अकोला, मूर्तिजापर, तेल्हारा, बार्शीटाकळी, बाळापूर या पाच तालुक्यांत दुष्काळ घोषित करून शासकीय मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, अकोट व पातूर तालुक्यातील ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी असल्याने या तालुक्यांना यातून वगळण्यात आले होते. मात्र, दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले. यासंदर्भात शेतकऱ्यांनी शासनदरबारी पाठपुरावा करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. दरम्यान शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करून अकोट व पातूर तालुक्यांना उशिरा दुष्काळग्रस्त घोषित करून ८२ कोटी ७ लाख ११ हजार १७२ रुपयांच्या शासकीय मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. तोपर्यंत अन्य पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे वाटपही झाले होते. आता दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी अकोट व पातूर तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. नवे सरकार तरी आता न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT