अमरावती जिल्हा बॅंकेच्या  ७३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी
अमरावती जिल्हा बॅंकेच्या ७३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी 
मुख्य बातम्या

अमरावती जिल्हा बॅंकेच्या ७३ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी

टीम अॅग्रोवन

अमरावती ः महाविकास आघाडीकडून दोन लाखांपर्यंतची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. या निर्णयाचा जिल्हा बॅंकेच्या ७३ हजार २४२ शेतकऱ्यांना लाभ होणार असून, योजनेच्या अटी व शर्तीनंतर यामध्ये स्पष्टता येणार आहे.  विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीन, कपाशीसारखे पीक घेतले जाते. त्यामुळे या पीकांसाठी कर्जमर्यादादेखील अत्यल्प आहे. परिणामी, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ या भागातील बहुतांश शेतकऱ्यांना होणार आहे. कर्जमाफीच्या पार्श्‍वभूमीवर बॅंकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्याना कर्जमाफीचा लाभ मिळणार असला तरी ही जून २०२० पर्यंत करण्यात यावी, अशी मागणी आहे.  कारण या वर्षी खरिपात कर्ज घेतलेला शेतकरी जून २०२० मध्ये थकबाकीदार होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखावर आहे. त्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ होईल. त्याकरिता कोणत्याही अर्जाची गरज नाही. आधार लिंक असलेल्या बॅंक खात्यात थेट कर्जमाफीची रक्‍कम जमा केली जाणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना या माफीचा लाभ मिळणार असला, तरी शासकीय कर्मचारी आणि आमदारांना माफीतून वगळण्यात आले आहे. 

तालुकानिहाय लाभास पात्र शेतकरी संख्या  अमरावती ६२५२, भातकुली ५१७६, नांदगाव खंडेश्‍वर ७४१७, दर्यापूर १११५८, अंजनगाव सूर्जी  ५४१४, चांदूरबाजार ५५६९, अचलपूर ६०६५, चिखलदरा १६२३, धारणी ३८९१, मोर्शी ६८४८, तिवसा ६०८७, चांदूर रेल्वे ३५८१, धामणगाव रेल्वे ४१६१. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT