प्रमुख नऊ प्रजातींच्या विविध बिया. (स्रोत ः कॅरोलिना सार्मिइन्टो)
प्रमुख नऊ प्रजातींच्या विविध बिया. (स्रोत ः कॅरोलिना सार्मिइन्टो)  
मुख्य बातम्या

तग धरण्यासाठी बिया वापरतात तीन धोरणे

वृत्तसेवा

उष्ण कटिबंधीय वनामध्ये सातत्याने होत असलेल्या बुरशी, जिवाणू, कीटक आणि प्राणी यांच्या हल्ल्यातून विविध झाडांच्या बिया वाचणे अत्यंत मुश्किल असते. अशा स्थितीमध्ये स्वतःला वाचवण्यासाठी बियांच्या नेमक्या कोणत्या बाबी उपयुक्त ठरतात, याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न स्मिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथील संशोधकांनी केला आहे. त्याचा फायदा जंगलांचे संवर्धन, पिकांचे व्यवस्थापन करण्यामध्ये होणार आहे. हे संशोधन जर्नल इकॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. प्रत्येक वनस्पतीच्या बियांच्या तग धरण्याच्य क्षमता भिन्न आहे. पृथ्वीवरील सर्वांत जुनी जिवंत बी आर्क्टिक मातीमध्ये ३० हजार वर्षांपेक्षा अधिक सुप्तावस्थेमध्ये राहिल्यानंतर अंकुरीत झाल्याचे आढळले आहे. मात्र, आर्द्रतापूर्ण वातावरणामध्ये बिया दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याविषयी माहिती देताना पनामा येथील स्थिथसोनियन ट्रॉपिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मधील पोस्ट डॉक्टरल संशोधक कॅमिलो झालामिया यांनी सांगितले, की उष्ण कटिबंधीय प्रदेशसामध्ये बिया जास्तीत जास्त काही दशकांपर्यंत जिवंत राहत असल्याचे दिसून आले आहे. या स्थितीमुळे वनस्पतींचे अंकुरण आणि जंगलाची पुनर्स्थापन यासाठी अडचणी उद्भवू शकतात. प्रत्येक बीला जंगलामध्ये सामान्यतः पाण्यात पडणे, पूर, दुष्काळ किंवा आग यांचा सामना करावा लागतो. या आव्हानांचा सामना करण्यासाठी बियांचे धोरण दोन प्रकारे ठरते.

  • वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होईपर्यंत जिवंत राहणे.
  • प्राण्याकडून खाल्ले जाण्यापासून वाचणे आणि मातीतील सूक्ष्मजीवांमुळे कुजण्यापासून वाचणे.
  • प्रसार ः पक्षी, वटवाघळे आणि वाऱ्यासोबत आसपासच्या जंगलामध्ये बियांचा प्रसार होतो. मातीमध्ये दीर्घकाळ गाडले गेल्यानंतर योग्य वेळी अंकुरण होऊन नव्या जंगलांची वाढ सुरू होते. अर्बाना कॅम्पेन येथील इल्लिनॉईज विद्यापीठातील प्रा. जिम डॅल्लिंग यांनी सांगितले, की प्रथमच बियांच्या सुप्तावस्था (योग्य वातावरण मिळेपर्यंत जिवंत राहण्याची क्रियेला इंग्रजीमध्ये डॉर्मन्सी म्हणतात.) आणि बियांची संरक्षण व्यवस्था (प्राण्यांकडून खाल्ले जाणे किंवा सूक्ष्मजीवांमुळे कुजणे यापासून संरक्षणाची बियांची व्यवस्था) या दोन महत्त्वाचा गुणधर्मांतील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. सामान्यतः मुख्य वनस्पती प्रजाती बीज बॅंकेमध्ये तग धरण्यासाठी तीन धोरणांपैकी एकाचा अवलंब करतात. झालामिया यांनी काही उदाहरणे दिली. उदा. काही बिया स्वतःभोवती कठीण कवच, आवरण तयार करतात, त्यामुळे प्राणी किंवा सूक्ष्मजीवांना त्याच्या जिवंत अंतर्गत भागापर्यंत पोचणे कठीण होते. काही बियांमध्ये तीव्र रसायने निर्माण होता, त्यामुळे प्राणी किंवा सूक्ष्मजीव दूर राहतात. काही बिया अल्पजिवी असल्या तरी मातीतील विशिष्ठ सूक्ष्मजीवांना आकर्षित करतात, त्यांचा फायदा संरक्षणासाठी होतो. पनामाच्या जंगलातील महत्त्वाच्या १६ वनस्पती प्रजातींवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या बियांच्या संदर्भात काही प्रश्नावली तयार करण्यात आली.

  • बी फोडणे कितपत अवघड आहे, बियावरील आवरणाची जाडी, आवरण बाह्य घटकांना कितपत आत येऊ देते, त्याचे वजन किती अशा स्वरूपाच्या प्रश्नासह कठिण आवरणांची स्थिती जाणून घेतली.
  • बियांतील रासायनिक संरक्षणाविषयी जाणण्यासाठी विश्लेषण करण्यात आले. त्यांचा विषारीपणा तपासण्यात आला.
  • अरिझोना विद्यापीठातील प्रा. बेट्सी अरनॉल्ड यांनी सांगितले, की बियांच्या स्वसंरक्षणातील गुंतवणूक ही त्यांच्या जमिनीमध्ये राहण्याच्या एकूण कालावधीशी सरळ जोडलेली असते. ज्या बिया मातीमध्ये दीर्घकाळ राहतात, त्या रासायनिक संरक्षणावर अवलंबून राहतात. ज्यांचा मातीतील कालावधी कमी असतो, त्या भौतिक संरक्षणावर अवलंबून असतात. या दोन्ही पद्धतींभोवतीच मातीतील बियांचा तग धरण्याचा कालावधी (काही महिन्यांपासून वर्षांपर्यंत) ठरतो. शेतीसाठीही फायदेशीर ः बिया कीड आणि रोगांना कशा प्रकारे टाळतात किंवा दूर ठेवतात, याविषयी जाणून घेतल्यास भात, गहू, मका यासारख्या बहुतांश शेतीयोग्य पिकांमध्ये त्याचा फायदा होणार आहे. बिया अवस्थेमध्ये येणाऱ्या रोगांना रोखण्यासाठी बीज प्रक्रियेच्या रसायनांवरील खर्चात बचत होऊ शकते.    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

    Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

    Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

    Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

    Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

    SCROLL FOR NEXT