पानांचे तुकडे करणाऱ्या मुंग्या. (स्रोत ः फियोना सोपर)
पानांचे तुकडे करणाऱ्या मुंग्या. (स्रोत ः फियोना सोपर)  
मुख्य बातम्या

पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते हरितगृह वायूंचे उत्सर्जन

वृत्तसेवा

उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह वायूचा मोठा नैसर्गिक स्रोत आहेत. यात तिथे असणाऱ्या छोट्या कीटकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत मोंटाना विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी रॉयल सोसायटी बी ः बायोलॉजिकल सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. अमेरिकेमध्ये आढळणाऱ्या कीटकांमध्ये पाने कुरतडणाऱ्या मुंग्या या आपल्या वैशिट्यपूर्ण क्रियांसाठी ओळखल्या जातात. हे आकाराचे छोटे वाटणारे सजीवही पर्यावरणातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाचे प्रमाण वाढवतात, असे मोंटाना विद्यापीठातील डब्ल्यू.ए. फ्रॅंक वनशास्त्र आणि संवर्धन महाविद्यालयातील संशोधिका फियोना सोपर यांच्या अभ्यासात आढळले आहे. त्यांनी प्रो. कॉरी क्वेवेलॅंड आणि विद्यार्थी अॅलाना शॉ यांच्यासह पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांच्या २२ वसाहतींचे सर्वेक्षण केले. या मुंग्यांच्या परिसरामध्ये अन्य जंगलाच्या तुलनेमध्ये सरासरीच्या दुप्पट इतका नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित होतो. या प्रकाराची तुलना सांडपाण्याची प्रक्रिया किंवा डेअरी परिसरातील शेणखतांच्या ढिगांशी करता येईल. त्याविषयी माहिती देताना फियोना म्हणाल्या, की कोस्टारिकातील जंगलामध्ये नायट्रस ऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये या मुंग्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या मुंग्या झाडांपासून पाने तोडून आपल्या वसाहतीमध्ये नेतात, त्यांना कुजवून त्यावर बुरशींची वाढ करतात. हे काम पूर्ण झाल्यानंतर हा सर्व टाकाऊ भाग विशिष्ठ ठिकाणी आणून टाकतात. यातून विविध वायू उत्सर्जित होतात. त्यामुळे या मुंग्यांच्या वसाहतीच्या परिसरामध्ये त्याचेप्रमाण अधिक असले तरी एकूण नैसर्गिक पर्यावरणाच्या तुलनेमध्ये ते फारसे नाही. मात्र, त्यांची या प्रक्रियेतील भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT