मुख्य बातम्या

सागरी तणामुळे मिळेल विषाणूजन्य रोगांसाठी प्रतिकारक गहू जात

सतीश कुलकर्णी

गहू पिकामध्ये येणाऱ्या स्ट्रिक मोझाइक विषाणूमुळे येणाऱ्या रोगांना प्रतिकारक गुणधर्म गहूवर्गीय सागरी तणामध्ये आढळून येतात. हे गुणधर्म गहू पिकामध्ये आणणे शक्‍य असून, त्यासाठी अमेरिकेतील साउथ डाकोटा राज्य विद्यापीठामध्ये दोन वर्षांचा संशोधन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकी कृषी विभागाने  २.५ लाख डॉलर इतके अनुदान दिले आहे. २०१४ मध्ये प्रा. वांगलोंग ली यांच्या एका प्रयोगामध्ये गहूवर्गीय सागरी तणांवर व्हिट स्ट्रिक विषाणूंचा प्रादुर्भाव होत नसल्याचे आढळले होते. त्यावर अधिक काम करताना त्यांनी त्यातून संकर तयार केले. २०१६ मध्ये झालेल्या प्रयोगामध्ये या संकरित रोपांच्या ओळीही विषाणूंचा प्रादुर्भावापासून मुक्त राहिल्या. त्याच वेळी त्यांच्या मूळ गहू जाती मात्र रोगाला बळी पडल्या होत्या. त्याविषयी माहिती देताना प्रा. वांगलोंग ली यांनी सांगितले, की इतिहासामध्येही अनेक वेळा गहू पिकाच्या नव्या जाती पैदास करण्यासाठी विविध सजातीय किंवा विजातीय प्रजातींचे साह्य घेतलेले आहे. उदा. गहू पिकामध्ये येणाऱ्या तांबेरा, पिवळा तांबेरा, भुरी रोगांसाठी प्रतिकारक जाती विकसित करताना मोहरीतील जनुकांचा वापर केला होता. संकराचे असे होतील फायदे ः विषाणूचा प्रतिकार हा तापमानासाठी संवेदनशील नसल्याचे दिसून आले. कारण सध्या गहू पिकामध्ये विषाणू प्रतिकारक असलेले जनुक हे ६४.४ अंश फॅरनहीटपेक्षा अधिक तापमानाला कार्य करत नाही. मात्र, या नव्याने विकसित केलेल्या जातींमध्ये ८२ अंश फॅरनहीटपर्यंतही प्रतिकारकता दिसून आली. सागरी तण आणि संकरित गहू जाती अधिक पाण्यासाठीही सहनशील आहेत. गहू पिकामध्ये पाणी साचून राहण्याची समस्या आर्कान्सास आणि लुझीयाना राज्यामध्ये व बांगलादेशामध्येही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी ही गहू जात फायदेशीर ठरू शकेल. सागरी गहूवर्गीय तणांची काडी ही तुलनेने टणक आहे. ती सॉफ्लाय या माशीलाही प्रतिकारक ठरू शकते. ही कीड मोंटाना, डाकोटा राज्यांच्या उत्तरेकडे संपूर्ण, तर दक्षिणेकडील काही भागांमध्ये वसंत ऋतूमधील आणि कोलोरॅडो आणि नेब्रास्का या राज्यांतील हिवाळी गहू पिकांसाठी त्रासदायक ठरते. ती गहू पिकाच्या पोकळ कांडीमध्ये अंडी घालते. त्यामुळे गहू रोप कोलमडते. सध्या ही प्रतिकारकता नेमक्‍या कोणत्या जनुकांमुळे येते, यावर संशोधन केले जात आहे. नेमके ते जनुक गहू पिकामध्ये अंतर्भूत करता येईल. त्यासाठी सागरी गहू तणाचे जनुकीय विश्‍लेषण केले असून, त्याची तुलना गहू जनुकीय संरचनेशी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT