आयडियल फाउंडेशनतर्फे ४१ शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मान 
आयडियल फाउंडेशनतर्फे ४१ शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मान  
मुख्य बातम्या

आयडियल फाउंडेशनतर्फे ४१ शेतकऱ्यांचा पुरस्काराने सन्मान 

टीम अॅग्रोवन

जालना : निसर्गाशी झुंज देत शेती उत्पादनाचे शिखर गाठणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे काम 'आयडियल'च आहे. हा सोहळा मराठवाड्यातील जालनासारख्या ठिकाणी घेऊन या भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे कौतुकास्पद काम आयडियल फाउंडेशनने केले आहे, असे मत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. सांगली येथील आयडियल फाउंडेशनतर्फे जालना येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकाच्या विविध भागातून प्रतिकूल परिस्थितीत चांगले उत्पादन घेणाऱ्या ४१ शेतकऱ्यांचा यावेळी आयडियल फार्मर ॲवॉर्डने सन्मान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ, कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.  सिंधूताई सकपाळ म्हणाल्या, पुरुष शेतकऱ्यांबरोबर महिला शेतकऱ्यांचाही सन्मान या सोहळ्यात होत असून, ही खूप आनंददायी बाब आहे. कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देण्यासाठी व आयात शुल्क वाढवून निर्यातीस चालना देण्यासाठी कृषिमूल्य आयोग सक्रिय आहे. याचे निश्‍चित चांगले परिणाम दिसतील.  यावेळी डॉ. एस. डी. सावंत यांनी द्राक्ष, डाळिंब यासह भाजीपाला पीक उत्पादनवाढीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  आयडियल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश औताडे यांनी शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. फाउंडेशनचे उपाध्यक्ष वैभव जाधव यांनी प्रास्ताविक तर आयडियल ॲग्री सर्चचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पाटील यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT