कमी मेदयुक्त दुधामुळे वार्धक्याचे प्रमाण होते कमी
कमी मेदयुक्त दुधामुळे वार्धक्याचे प्रमाण होते कमी 
मुख्य बातम्या

कमी फॅटचे दुध पिल्यास म्हतारपण कमी होतं..! संशोधनातील निष्कर्ष !!

वृत्तसेवा

कमी फॅट(मेद)युक्त दुधाचा आहारामध्ये वापर केल्यास प्रौढांमध्ये वार्धक्य ४.५ वर्षाने पुढे जात असल्याचे दिसून आले आहे. संपूर्णपणे मेदरहित किंवा १ टक्के मेद असलेल्या दुधाच्या आहारातील समावेशाचा अभ्यास ब्रिघम यंग विद्यापीठामध्ये करण्यात आला होता. ब्रिघम विद्यापीठातील प्रो. लॅरी टकर यांनी अमेरिकेतील ५८३४ प्रौढ व्यक्तींच्या आहार व त्यातील दुधाच्या प्रमाणाचा अभ्यास केला. ज्या लोकांच्या आहारामध्ये एक टक्क्यापेक्षा कमी मेद (फॅट) असलेल्या दुधाचा समावेश आहे, अशा व्यक्तींमध्ये वार्धक्यांची लक्षणे २ टक्के व त्यापेक्षा मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांपेक्षा काही वर्षे उशिरा दिसत असल्याचे दिसून आले. त्याविषयी माहिती देताना टकर म्हणाले, की मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांच्या तुलनेमध्ये मेदरहित किंवा कमी मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांमध्ये वार्धक्याशी संबंधित बाबींचा अत्यंत कमी प्रमाणात आढळल्या. टकर यांनी दैनंदिन दूध पिणाऱ्या लोकांप्रमाणे आठवड्यातून एकदा किंवा कमी वारंवारितेने दूध घेणाऱ्या लोकांतील गुणसूत्रातील शेपटीकडील टेलोमेरे या संरचनेच्या लांबीशी असलेला संबंध तपासला. त्याचप्रमाणे संपूर्ण दूध, दोन टक्के किंवा १ टक्के किंवा मलई काढलेल्या दुधाचा वापर करणाऱ्या लोकांमधील संबंधही तपासण्यात आला. त्याचे निष्कर्ष ऑक्सिडेटिव्ह मेडिसीन अॅण्ड सेल्युलर लॉन्जेव्हिटी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. संशोधनातील निष्कर्ष ः

  • जे लोक अधिक मेदयुक्त दूध आहारात घेतात, त्यांच्या टेलोमेर आखूड आढळल्या.
  • दुधातील प्रत्येक एक टक्के वाढलेल्या मेदामागे गुणसूत्रातील शेवटच्या टेलोमेर या ६९ व्या जोड्या आखूड झाल्याचे दिसून आले. त्याचा जैविक वयावर होणारा परिणाम हा चार वर्षांपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे.
  • जे लोक अधिक प्रमाणात दूध घेतात, जे संपूर्ण दूध घेतात अशा लोकांमध्ये टेलोमेरमधील १४५वी मूलभूत जोडी हा कमी मेदयुक्त दूध घेणाऱ्या लोकांपेक्षा आखूड आढळली.
  • आहारविषयक मार्गदर्शक सूचनांमध्ये (२०१५ ते २०२०) प्रौढांनी मेदरहित किंवा कमी मेदयुक्त दुधाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. दूध पिणे हे काही वाईट नाही, मात्र दुधाचा कोणता प्रकार आपल्या आहारामध्ये आहे, याविषयी जागरूकता असणे महत्त्वाचे असल्याचे टकर यांनी सांगितले.
  • आहारातील दुधाचे प्रमाण ः अभ्यासामध्ये जवळपास अर्धे लोक हे दैनंदिन दूध घेणारे असून, उर्वरित एक चतुर्थांश लोक आठवड्यातून किमान एकदा दूध घेणारे होते. यातील तीनपैकी एक प्रौढ हा संपूर्ण मेदयुक्त दूध घेतो, तर अन्य ३० टक्के लोक २ टक्के मेदयुक्त दूध घेतात. त्यातही १० टक्के लोक हे १ टक्के दूध घेतात, तर अन्य १७ टक्के लोक मेदरहित दुधाचा वापर करतात. १३ टक्के लोक गायीचे दूध अजिबात पीत नाहीत.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

    Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

    Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

    Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

    Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

    SCROLL FOR NEXT