dam storage
dam storage 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १५३ टीएमसी साठा

sandeep navale

पुणे : गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये १५३.८९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. यातील बारा धरणे शंभर टक्के भरली असून, पाच धरण प्रकल्प ९० टक्‍क्‍यांहून अधिक भरली आहेत. जिल्ह्यात साधारणपणे १७-१८ जूनच्या दरम्यान मॉन्सून दाखल झाला. त्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्‍चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर तालुक्‍यांत जून- जुलैमध्ये भात लागवडीला चांगलाच वेग आला होता. पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्‍यातही पेरण्यांना सुरवात झाली. त्यानंतर पूर्वेकडील तालुक्‍यात कमीअधिक, काही काळ पावसाचा खंड पडला होता. परंतु पश्‍चिमेकडील तालुक्‍यात पाऊस उघडीप न देता सतत संततधार बरसत होता. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत होता.

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एक जूनपासून ते आतापर्यंत सर्वाधिक तीन हजार १९६ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरले. वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३ हजार ३८, टेमघर २८५०, वरसगाव १९०८, पानशेत १८८१, नीरा देवधर १९२२, गुंजवणी १६९७, आंध्रा १४३४, भामा आसखेड एक हजार ७१, कळमोडी १३७७, डिंभे ११८२, पिंपळगाव जोगे ९८१, माणिकडोह ९४९, येडगाव ८६०, चासकमान ८१६, कासारसाई ९८२, खडकवासला ६०९, भाटघर ५३०, घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २८४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र यापैकी सहा धरणांत कमी पाणीसाठा आहे. 

धरणनिहाय झालेला पाणीसाठा (टक्के) 

पूर्ण भरलेली धरणे ः कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंध्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत, खडकवासला, वरसगाव, नीरा देवघर, भाटघर.  ९० टक्‍क्‍यांहून अधिक भरलेली धरणे ः वडज ९८.५८, डिंभे ९९.५३, घोड ९४.०१, भामा आसखेड ९८.०३, वीर ९६.४२. ९० टक्‍क्‍यांहून कमी भरलेली धरणे ः पिंपळगाव जोगे ७९.२८, माणिकडोह ७४.६७, येडगाव ७२.५८, विसापूर ४०.७१, टेमघर ५३.१३, गुंजवणी ६०.४१.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT