नव्या जाती विकसनामध्ये मुळांच्या संरचनेकडेही हवे लक्ष
नव्या जाती विकसनामध्ये मुळांच्या संरचनेकडेही हवे लक्ष 
मुख्य बातम्या

नव्या जाती विकसनामध्ये मुळांच्या संरचनेकडेही हवे लक्ष

वृत्तसेवा

पिकांच्या वाढ, पोषण आणि उत्पादनासाठी त्यांची मुळे महत्त्वाची असतात. दुष्काळ किंवा तीव्र परिस्थितीमध्ये वाढीसाठी मुळांच्या योग्य संरचना असलेल्या जातींचा विकास करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पेनसिल्वानिया विद्यापीठामध्ये कडधान्य पिकामध्ये मुळांच्या संरचनेवर लक्ष केंद्रित करून जातींच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पिकांच्या वाढीमध्ये मुळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पाणी, पोषक अन्नद्रव्ये शोषण्यासोबतच जमिनीशी घट्ट धरून ठेवण्याचे कामही मुळे करतात. मात्र, वेगवेगळ्या वनस्पतींमध्ये मुळांचे प्रकारही वेगळे असतात. उदा. गाजर आणि निवडुंग. गाजराचे सोटमुळ असून, ती खोल जमिनीमध्ये जाऊन पाणी व अन्नद्रव्यांचे शोषण करतात. त्या तुलनेमध्ये निवडुंगाची तंतुमय मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. वाळवंटी वातावरणांमध्ये अत्यंत कमी असलेल्या पावसाचे पाणी भरपूर प्रमाणात शोषतात. पेनसिल्वानिया राज्य विद्यापीठातील प्रा. जोनॅथन पी. लिंच व सहकाऱ्यांनी शेंगावर्गीय पिकांच्या मुळांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या अभ्यासाविषयी माहिती देताना लिंच म्हणाले की, कडधान्ये ही प्रथिनांची गरज भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून , अनेक ठिकाणी त्यांचे उत्पादन हे कमी येते. विशेषतः ज्या भागामध्ये दुष्काळ, अधिक उष्णता आणि मातीची सुपीकता अशा समस्या असलेल्या भागांमध्ये उत्पादन अत्यल्प मिळते. वेगवेगळ्या वातावरणांमध्ये चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या पिकांच्या जाती विकसित करण्यासाठी पैदास कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यातही मुळांच्या रचनेवर अधिक भर देण्याची आवश्यकता आहे. मुळांच्या संरचनांचा केला अभ्यास

  • या अभ्यासात मुळांची संरचना आणि एकूण वनस्पती जीवनातील विविध अडचणी यांच्या सहसंबंधाचा शोध घेण्यात आला. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कडधान्यासोबत शेंगावर्गीय पिकांच्या मुळांच्या वाढीचे विश्लेषण केले. कोणत्या वातावरणांमध्ये कोणत्या प्रकारची मुळे व त्यांची संरचना उपयुक्त ठरू शकेल, याचा शोध घेण्यात आला.
  • मुळे उथळ जमिनीत वाढतात, तशीच ती खोलवर जाऊन अन्नद्रव्ये मिळवतात. स्फुरद, पालाश सारखी अन्नद्रव्ये ही प्रामुख्याने मातीच्या वरील थरामध्ये असतात. तर पाणी आणि नत्र ही सामान्यतः खोल मातीमध्ये असतात.
  • बहुतांश वनस्पती या मातीच्या एक किंवा दुसऱ्या प्रकारावर लक्ष केंद्रित करतात. पर्यायाने अन्य थरांतील मातीतील अन्नद्रव्ये किंवा पाणी याचा कार्यक्षमपणे वापर होत नाही.
  • लिंच म्हणाले, की पाणी आणि अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या वनस्पतीला पर्यावरणाशी जुळवून घेण्यामध्ये मुळाची संरचना ही महत्त्वाची ठरते. या दोन्ही प्रकारच्या मुळांचे योग्य प्रकारे संतुलन साधता आले, तर अधिक फायदा होऊ शकेल, असे वाटते. पैदास कार्यक्रमाची आखणी करताना मुळांच्या गुणधर्मांवर अधिक काम व्हायला हवे. उदा. मुख्य मुळे अधिक सशक्त आणि पांढरी मुळे अधिक लांब मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • विशेषतः खराब झालेल्या जमिनी, कोरडे वातावरण यात वाढू शकणाऱ्या वनस्पती भविष्यांमध्ये अधिक आवश्यक ठरणार आहेत.
  • कडधान्य पिकांचे महत्त्व ः कडधान्य वर्गीय पिके मानवी आहार आणि पशूआहारातील प्रथिनांच्या पूर्ततेसाठी ही पिके महत्त्वाची आहेत. तसेच लोह आणि जस्तासारखी सूक्ष्म प्रमाणात लागणारी अन्नद्रव्येही उपलब्ध होतात. त्याच प्रमाणे कडधान्यवर्गीय पिकांमध्ये जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ होते. कारण ही पिके हवेतून नत्राचे शोषण करून जमिनीत स्थिर करतात.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

    Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

    Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

    Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

    Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

    SCROLL FOR NEXT