keli crop
keli crop 
मुख्य बातम्या

दक्षिण महाराष्ट्रात केळी लागवडीत यंदाही घट

Raj Chougule

कोल्हापूर  ः गेल्या वर्षी कमी असलेला दर व अवर्षणामुळे यंदा दक्षिण महाराष्ट्रात केळी लागवडीत घट झाली आहे. गेल्या वर्षीही पाऊस नसल्याने केळीची लागवड कमी झाली होती. यंदाही त्यात विशेष वाढ झाली नाही.  कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एकूण सुमारे तीन हजार एकर इतके केळीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी केळीचे दर टनास तीन हजार रुपयांच्या खाली गेले. यामुळे शेतकऱ्यांनी केळीची लागवड टाळली. त्यातच पाऊस व जिल्ह्यातील धरणांमध्ये आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली. यंदाही या स्थितीत फारसा फरक झाला नसल्याचे केळी उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

उसापाठोपाठ शेतकरी केळी पिकाला महत्त्व देतात. गेल्या वर्षी केळीच्या तुलनेत उसाला चांगला दर मिळाला. यंदाही केंद्राने एफआरपीच्या रकमेत वाढ केल्याने उसाला टनाला तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे यंदाही शेतकरी उसालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे.

पावसाने दडी मारल्याने मध्यंतरी काही काळ उसाची लागवडही थांबली होती. पण जलाशयांत पुरेसे पाणी असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा ऊस लागवडीकडे लक्ष दिले आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रात यंदाही केळीची लागवड समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. अनेक केळी उत्पादकांनी केळीचे क्षेत्र कमी करून पुन्हा उस लागवड केली आहे. यामुळे जितकी लागवड अपेक्षित होती तितकी झाली नाही.

सध्या या भागातही केळी रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांतून राज्यभरातून केळीची रोपे पाठविली जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याच्या इतर भागातून केळी रोपांची मागणी कायम असली तरी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून मात्र केळीची रोपांची मागणी खूपच कमी असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. उसाच्या दरवाढीमुळे केळीला सध्या चांगला दर मिळूनही शेतकरी केळीचे उत्पादन घेण्यास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दक्षिण महाराष्ट्रात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT