संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

राज्यात गारठा आणखी वाढण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे  : उत्तरेकडील वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राकडे येऊ लागल्याने राज्यात थंडी वाढली आहे. विदर्भाच्या तापमानात मोठी घट झाली असून, किमान तापमान ११ अंशांजवळ आल्याने नागपूर आणि गोंदिया गारठले आहे. राज्यात निरभ्र व कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. पूर्व मध्य प्रदेशातील ‘मंडला’ येथे सोमवारी (ता. २६) देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील नीचांकी ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. पूर्व मध्य प्रदेशाला लागून असलेल्या विदर्भातील नागपूर आणि गोंदियातही तापमानात मोठी घट झाली आहे. नागपूर येथे राज्यातील नीचांकी ११.२ तर गोंदियात ११.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानाही घट होत बहुतांशी ठिकाणी पारा १५ अंशांच्या खाली घसरला आहे. नगर येथे तापमान १२ अंशांपर्यंत खाली उतरले आहे. कोकणात तापमान सरासरीच्या जवळ आले असले तरी पारा २० अंशांच्या वरच आहे.  

सोमवार (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १३.६(०), नगर १२.० (-३) जळगाव १४.६(१), कोल्हापूर १९.०(२), महाबळेश्‍वर १५.८(२), मालेगाव १५.२ (२), नाशिक १३.२(१), सांगली १६.३(०), सातारा १५.०(-१), सोलापूर १७.२(०), सांताक्रुझ २१.०(१), अलिबाग २०.९(१), रत्नागिरी २०.८(-१), डहाणू २१.३(१), आैरंगाबाद १२.८(०), परभणी १३.२ (-३), नांदेड १५.०(१), उस्मानाबाद १६.१, अकोला १४.८(०), अमरावती १६.०(०), बुलडाणा १४.२ (-२), चंद्रपूर १५.६(०), गोंदिया ११.५(-४), नागपूर ११.२(-३), वर्धा १३.२(-२), यवतमाळ १३.४ (-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT