केसलवाडा, गोंदिया ः यंत्राद्वारे रोवणी करताना जसवंता पातोडे व त्यांचे कुटुंबीय.
केसलवाडा, गोंदिया ः यंत्राद्वारे रोवणी करताना जसवंता पातोडे व त्यांचे कुटुंबीय. 
मुख्य बातम्या

महिला शेतकऱ्याने अवलंबिला यांत्रिकीकरणाचा पर्याय

टीम अॅग्रोवन

गोंदियाः भातपट्ट्यात कृषी विभागाच्या वतीने यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत केसलवाडा येथील महिला शेतकरी जसवंता धनिराम पातोडे यांनी या वर्षीच्या हंगामात रोवणीकरिता यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबिला.  सडक अर्जुनी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी सहायक एस. आर. कुंभलवार यांच्या मार्गदर्शनात तालुक्‍यात यांत्रिकीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्याला प्रतिसाद देत महिला शेतकरी जसवंता पातोडे यांनी १.६० आर क्षेत्रावर मॅट नर्सरी तयार केली. त्यातील रोपांचा वापर करून यंत्राच्या साह्याने रोवणीचेया कामास सुरवात करण्यात आली. यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे तीन टप्पे असतात. त्यामध्ये लोडबी फ्रेमच्या साह्याने खतमिश्रित मातीचा चिखल पसरवून २१ बाय ४४ बाय २ सेंटिमीटर आकाराची फ्रेम तयार करून मॅट नर्सरी तयार केली जाते. रोवणीसाठी बांधी तयार ठेवावी लागते. त्यानंतर भात रोवणी यंत्राने लागवड करावी लागते. एका फेरीमध्ये आठ ओळींची रोवणी करून दोन ओळींतील अंतर २२ बाय २४ सेंटिमीटर तर दोन रोपांतील अंतर १० ते २३ सेंटिमीटर ठेवता येते. जसवंता पातोडे यांना गेल्या वर्षी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अनुदानावर हे यंत्र मिळाले आहे. रोवणीकामी महिला शेतकऱ्यांचे पती धनिराम पातोडे, भाऊ रमेश भेंडारकर हे सहकार्य करीत आहेत. यांत्रिकीकरणामुळे श्रम आणि पैसा वाचत असल्याने इतर शेतकऱ्यांनीदेखील यांत्रिकीकरण पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन जसवंता पातोडे यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT