बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी येथील शेतकऱ्यांचा निर्धार
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी येथील शेतकऱ्यांचा निर्धार 
मुख्य बातम्या

बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी येथील शेतकऱ्यांचा निर्धार

टीम अॅग्रोवन

बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने पेरणी करण्याबाबत जनजागृती वाढत आहे. मेहकर तालुक्यातील विश्वी येथे आयोजित शेतीशाळेत बीबीएफ तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषी विभागाने दाखविल्यानंतर त्याचे फायदे लक्षात घेता येथील शेतकऱ्यांनी याच तंत्राने पेरणी करण्याचा निर्धार केला.  या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी नारायण देशमुख, तालुका कृषी अधिकारी सत्येन्द्र चिंतलवाड, देऊळगावराजा तालुका कृषी अधिकारी श्री. मासाळकर व प्रमुख मार्गदर्शक शेतीशाळा तज्ज्ञ विठ्ठल धांड यांची उपस्थिती होती. शेतीशाळेत शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकता वाढीच्या दृष्टीने रुंद सरी वरंबा पद्धत म्हणजे बीएफ तंत्रज्ञानाचे सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.  या वेळी श्री. देशमुख यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचे फायदे विषद करताना या तंत्रज्ञानामुळे सोयाबीन पिकाला आवश्यक पाण्याची गरज पूर्ण होत असल्याचे सांगितले. शेतीशाळेला उपस्थित शेतक-यांनी हंगामात प्रत्येकी किमान एक एकर सोयाबीन पेरणी या तंत्रज्ञानाने करण्याचा निर्धार केला. संतोष गायकवाड यांनी आभार मानले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT