आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता जबाबदारी घ्यावी Reservation question by people's representatives Take responsibility now
आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता जबाबदारी घ्यावी Reservation question by people's representatives Take responsibility now 
मुख्य बातम्या

आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता जबाबदारी घ्यावी

टीम अॅग्रोवन

नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. बहुजनांना आरक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सर्वात पहिल्यांदा प्रयत्न केले. आज तोच समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गरीब मराठा बाजूला सारला गेला; या समाजाला आता आरक्षण मिळावे. यासाठी समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो, आता तुम्ही बोला. तुमची भूमिका स्पष्ट करावी अन् जबाबदारी घ्यावी,’’ अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नाशिक येथे मराठा क्रांती मूक आंदोलनाचे आयोजन सोमवारी (ता. २१) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मूक मोर्चाला सुरुवात झाली. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,  पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, भारती पवार, आमदार दिलीप बनकर आदींसह आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, या बाबत दुमत नाही, माझ्या पक्षाची भूमिका तीच आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. गरज पडल्यास दिल्लीकडे कूच करा; आम्ही सोबतीला  संभाजीराजे तुम्ही आम्हाला जबाबदारी सांगा, समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारकडे  पाठपुरावा करण्याची  जबाबदारी पार पाडू. राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक आहे. समाजाला राज्य पातळीवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, काही गरज पडल्यास दिल्लीकडे कूच करा, जिल्हा खंबीरपणे आपल्या पाठीशी  उभा राहील. मात्र हे करत असताना समाजाच्या नावाखाली राजकारण करणारे खड्यासारखा बाजूला करा, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT