आरसीईपी
आरसीईपी  
मुख्य बातम्या

‘आरसीईपी’ला भारतामुळे तूर्त ब्रेक

टीम अॅग्रोवन

बॅंकॉक, थायलंड ः वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचे भवितव्य पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे येथे सुरू असलेल्या आशियान परिषदेत या करारावर सह्या होऊ शकल्या नाहीत, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली.  बँकॉक येथे आशियान देशांची तीन दिवसीय परिषद झाली. या परिषदेत आशियानचे १० सदस्य देश आणि चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत असे सोळा देश मिळून जगातील सर्वांत मोठा मुक्त व्यापार झोन निर्मितीसाठी ‘आरसीईपी’ करारावर सह्या करणार होते.   या वेळी चीनने ‘आरसीईपी’ करार मान्यतेसाठी रेटा केला. अमेरिकेसोबत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे बिघडलेला व्यापारी ताळेबंद सुस्थितीत आणण्यासाठी आणि पूर्वेकडील बाजारपेठांची उपलब्धता वाढविण्यासाठी चीनने या परिषदेत करार मान्यतेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. या वेळी भारत वगळता इतर १५ देश या करारावर सह्या करण्यास तयार आहेत. भारताने या वेळी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला. भारताने या करारावर सह्या केल्यास चीनमधून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचा पूर देशात येईल आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, ही भीती त्यामागे होती. देशातील उद्योग आणि शेती क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी भारताने बाजार उपलब्धता आणि संरक्षित वस्तूंचा मुद्दा उपस्थित केला आहे.  सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत ः चीन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, ‘आरसीईपी’तून सर्वच बाजूंनी रास्त फायदा मिळावा, भारताला आणि सर्व भागीदार देशांनाही लाभ मिळावा अशी,’’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यावर ‘‘आशियान परिषदेत येऊ घातलेला करार हा ‘प्रेरणादायी प्रक्रिया’ आहे, या प्रक्रियेत सर्वच भागीदारांच्या अपेक्षा पूर्ण होतीलच असे नाही,’’ असे चीनने म्हटले आहे. 

भारतासाठी ‘आरसीईपी’चे दरवाजे पूर्णतः उघडे ः ऑस्ट्रेलिया ‘‘भारताच्या नवीन मागणीने ‘आरसीईपी’ कराराला उशीर होत आहे. ‘आरसीईपी’मध्ये सहभागासाठी इच्छा झाल्यास भारतासाठी दरवाजे नेहमी पूर्णतः उघडे असतील. इतर देश भारताशिवाय करार पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. हा करार भारत आणि सहभागी सर्वच देशांसाठी लाभदायक आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT