राजारामबापू पा़टील जन्मशताब्दीस १ ऑगस्टला प्रारंभ: केंद्रीय मंत्री गडकरी प्रमुख उपस्थित
राजारामबापू पा़टील जन्मशताब्दीस १ ऑगस्टला प्रारंभ: केंद्रीय मंत्री गडकरी प्रमुख उपस्थित 
मुख्य बातम्या

राजारामबापू पा़टील जन्मशताब्दीस १ ऑगस्टला प्रारंभ: केंद्रीय मंत्री गडकरी प्रमुख उपस्थित

टीम अॅग्रोवन

सांगली ः लोकनेते राजारामबापू पाटील जन्मशताब्दी वर्षास एक ऑगस्टला सुरवात होत आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘राजयोगी’ या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (ता. १) भावे नाट्य मंदिरात होईल. महोत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘राजारामबापू हे कार्यकर्ता घडवणारे केंद्रच होते. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याला व आठवणींना उजाळा देण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. जन्मशताब्दी वर्षाची सुरवात सांगलीत एक ऑगस्टला होईल. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याहस्ते लेखिका सरोजिनी चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘राजयोगी’ या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन होईल. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले असून ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात राजारामबापूंच्या स्मारक स्थापनेची घोषणा केली जाईल. एक ऑगस्टला पुणे, नाशिक, नगर, लातूर, औरंगाबाद, अमरावती येथेही जन्मशताब्दी वर्षास सुरवात होईल.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘जन्मशताब्दी वर्षात राज्यात सहा विभागांत विविध कार्यक्रम होतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गुणगौरव होईल. राजारामबापू हे पदयात्री होते. त्यामुळे पदयात्रा काढून आठवणींना उजाळा दिला जाईल. बुधगावचे शाहीर बापूराव विभूते यांनी बापूंच्या जीवनावर पोवाडा लिहिला आहे. वर्षभर विविध कार्यक्रमात हा पोवाडा सादर केला जाईल. जन्मशताब्दी वर्षाचा समारोप मुंबईत एक ऑगस्ट २०२० रोजी होईल. बापूसाहेब पुजारी यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे तेव्हा प्रकाशन होईल.’’ 

समितीचे उपाध्यक्ष बापूसाहेब पुजारी, मकरंद देशपांडे, कार्याध्यक्ष प्रा. शरद पाटील, कोषाध्यक्ष तथा जिल्हा बॅंक अध्यक्ष दिलीप पाटील या वेळी उपस्थित होते. 

सांगलीतील कार्यक्रम राज्यस्तरीय  एक ऑगस्टला इस्लामपूर येथेही राजारामबापूंच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम होणार आहे. दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी होत आहेत. सांगलीतील कार्यक्रम हा राज्यस्तरीय असून त्यातून जन्मशताब्दी वर्षास सुरवात होईल, असे श्री. डांगे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT