महाचक्रिवादळ
महाचक्रिवादळ  
मुख्य बातम्या

‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला आज धडकणार

टीम अॅग्रोवन

पुणे: अरबी समुद्रातील अतितीव्र ‘महा’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली आहे. चक्रीवादळ आज (ता. ६) मध्यरात्रीनंतर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह दिव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टीला धडकणार आहे. वादळ धडकत असताना समुद्रात उंच लाटा उसळतील, जोरदार वाऱ्याच्या झोतासह मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. आज (ता. ६) गुजरात, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  मंगळवारी सकाळी ‘महा’ चक्रीवादळ वेरावळपासून ७२० किलोमीटर, तर दिवपासून ७७० किलोमीटर, तर पोरबंदरपासून ६७० किलोमीटर दूर पश्चिमेकडे अरबी समुद्रात होते. मंगळवारी (ता. ५) दुपारनंतर वादळ वेगाने गुजरातकडे सरकण्यास सुरवात झाली. या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातसह महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत वेगावान वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत  अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकामागून एक चक्रीवादळांची निर्मिती होत आहे. गेल्या आठवड्यात आलेल्या ‘क्यार’ वादळानंतर ‘महा’ चक्रीवादळ आले आहे. तर पाठोपाठ बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्राजवळ तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ७) या भागात ‘बुलबुल’ चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही वादळी प्रणाली काही काळ ओडिशाच्या दिशेने येऊन, नंतर उत्तरेकडे पश्चिम बंगालकडे जाण्याचे संकेत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

World Veterinary Day : मानवी आरोग्यातही पशुवैद्यकाचे बहुमूल्य योगदान

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

SCROLL FOR NEXT