‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची तीव्रता वाढली..!
‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची तीव्रता वाढली..! 
मुख्य बातम्या

‘महा’ चक्रीवादळ निवळले; बुलबुलची तीव्रता वाढली..!

टीम अॅग्रोवन

पुणे : ‘महा’ चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येताना निवळले असून, गुरुवारी (ता. ७ ) दुपारपर्यंत किनाऱ्यालगतच्या भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. या प्रणालीमुळे गुजरात, उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान निर्माण झाले होते. तर राज्याच्या काही भागांत उकाड्यात प्रचंड वाढ होऊन पावसाळी ढग गोळा होऊ लागले होते. आज (ता. ८) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तापमानात वाढ कायम आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर, बुलडाण्यात तापमान ३० अंशांच्या खाली आहे, तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा तिशीपार आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल ३० ते ३४ अंश, तर किमान तापमान १७ ते २५ अंशांच्या आसपास होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अमरावती येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.७ (०.९), नगर ३१.६ (०.५), जळगाव ३३.५ (०.०), कोल्हापूर २९.७ (-१.१), महाबळेश्वर २४.५ (-१.१), मालेगाव ३१.६ (-०.७), नाशिक ३२.४ (१.०), सातारा ३०.८ (१.३), सोलापूर ३२.८ (१.१), अलिबाग ३०.५ (-२.९), डहाणू ३२.० (-१.०), सांताक्रूझ ३२.८ (-१.४), रत्नागिरी ३३.२ (-०.६), औरंगाबाद ३१.४ (०.६), परभणी ३२.१ (१.०), नांदेड ३३.० (१.२), अकोला ३३.३ (१.०), अमरावती ३४.२ (२.१), बुलडाणा २८.० (-१.१), ब्रह्मपुरी ३३.९ (२.८), चंद्रपूर ३२.६ (१.२), गोंदिया ३१.० (-०.१), नागपूर ३३.३ (२.१), वर्धा ३३.० (१.५), यवतमाळ ३२.० (१.६). ‘बुलबुल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढतेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. ओडिशाच्या परादीपपासून ६८० किलोमीटर आग्नेयेकडे, पश्‍चिम बंगालच्या सागर बेटापासून ७८० किलोमीटर दक्षिणेकडे ही प्रणाली घोंगावत होती. आज (ता. ८) वादळ अतितीव्र होणार असून, ते पश्‍चिम बंगाल आणि बांगलादेशाच्या किनाऱ्यांकडे जाण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT