,Kolhapur, Sangli ‘Krishipump customers pay Rs 2.5 crore
,Kolhapur, Sangli ‘Krishipump customers pay Rs 2.5 crore  
मुख्य बातम्या

कोल्हापूर, सांगलीत ‘कृषिपंप ग्राहकांकडून अडीच कोटींचा भरणा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ५ हजार २२० कृषी ग्राहकांनी २ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करून कृषी धोरणात सहभाग नोंदविला, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.

राज्य शासनाने कृषी ग्राहकांसाठी निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफीनंतर उर्वरित वीजबिल थकबाकीत ५० टक्के माफीची संधी कृषी धोरणाच्या माध्यमातून दिली आहे. कृषी ग्राहकांना या धोरणाचा लाभ व्हावा, या साठी महावितरण यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत. आता या धोरणाचा लाभ घेण्यासाठी कृषी ग्राहक पुढाकार घेत आहेत. 

मागील तीन दिवसांत कृषी धोरणात सहभाग नोंदवत कोल्हापूर जिल्ह्यातील २ हजार ८०६ कृषी ग्राहकांनी १ कोटी २८ लाख रुपये व सांगली जिल्ह्यातील २ हजार ४१४ कृषी ग्राहकांनी १ कोटी २४ लाख रुपये थकबाकीचा भरणा केला आहे, असे महावितरणतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

३१ मार्च २०२२ पर्यंतच्या मुदतीत सहभाग नोंदवून शेतकऱ्यांनी वीजबिलातून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT