मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन अंतिम टप्प्यात
मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन अंतिम टप्प्यात  
मुख्य बातम्या

मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन अंतिम टप्प्यात

टीम अॅग्रोवन

नाशिक : लोकसभा निवडणूकीची मतमोजणी २३ मे रोजी होणार असून, जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील सर्व ईव्हीएम मशिन अंबड येथील वेअर हाउसमध्ये ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी आत्तापर्यंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलिस बंदोबस्तासह मतमोजणीसाठी लागणाऱ्या सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली. प्रशासनाकडून काटेकोरपणे सर्व कामकाज होत असून, विशेष निगराणी ठेवण्यात आली आहे. पोलिस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांचा बंदोबस्तात समावेश असून, परिसरात ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या उमेदवारांचे समर्थक, कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आवार घालण्यासाठी वेअर हाउसकडे येणारे रस्ते ठराविक अंतरावर बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ ओळखपत्र असणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रामध्ये विधानसभा मतदार संघनिहाय टेबल मांडण्यात येणार आहेत. एका केंद्रासाठी सात टेबल असतील. दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक निर्णय अधिकारी यांना वेअर हाउस परिसरातील स्ट्राँग रूममध्ये प्रवेश देण्यात येईल. त्यांच्यासमोर मतपेट्यांचे सील तोडण्यात येईल आणि पावणेआठनंतर मतमोजणीला सुरवात होईल, असे आनंदकर यांनी सांगितले. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी ८४ टेबल लावण्यात येणार असून, नाशिकसाठी २७, तर दिंडोरीसाठी मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत. एका फेरीसाठी ४५ मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे. टपाल मते व ऑनलाइन मतपत्रिकांसाठी स्वतंत्र मोजणी टपालाद्वारे आलेल्या मतदानाची स्वतंत्र मोजणी होणार आहे. जिल्ह्यातील सात हजार ५०० जवानांना ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या. प्रत्येक मतपत्रिकेला क्यूआर कोड देण्यात आला आहे. मतमोजणीच्या दिवशी प्राप्त झालेल्या मतपत्रिकांच्या झेरॉक्स काढल्या जाणार आहेत. क्यूआर कोड यंत्राच्या साह्याने मतपत्रिका तपासल्या जातील. त्यासाठी ३० क्यूआर कोड यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रत्येक मतपत्रिकेला कोड देण्यात आल्याने बनावट मतपत्रिकांच्या आक्षेपाला कोठेही थारा नसेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणी केंद्राला आनंदकर यांच्या समवेत जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींनी भेट दिली. या वेळी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT