भंडारा जिल्ह्यात ९० हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा
भंडारा जिल्ह्यात ९० हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा 
मुख्य बातम्या

भंडारा जिल्ह्यात ९० हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

टीम अॅग्रोवन

भंडारा  ः अनिश्चित पाऊसमान आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री पीकविमा योजनेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यातूनच जिल्ह्यात सुमारे ९० हजार २४२ शेतकऱ्यांनी ३६ हजार ५६ हेक्‍टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.  भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी सर्वदूर ओळखला जातो. एक लाख ७० हजार हेक्‍टर क्षेत्रावर धानाची लागवड होते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत असल्याने रोवणीचे काम प्रभावित होत आहे. त्यासोबतच पऱ्हे टाकल्यानंतर पाऊस लांबल्याने त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याची स्थिती आहे. परिणामी, अनिश्चित पाऊसमानामुळे पीकविमा काढण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. ३१ जुलैपर्यंत रोवणी न झाल्यास विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्‍के विमा मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा उतरविण्यास बॅंकांनी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे. सुरवातीला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा उतरविण्यासाठी बॅंकांत एकच गर्दी केली होती. जिल्ह्यात पीकविमा योजनेच्या शेवटच्या दिवसापर्यंत ९० हजार २४२ शेतकऱ्यांनी ३६ हजार ५६ हेक्‍टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. ८३ लाख ७०१ रुपयांचा विमा हप्ता त्यापोटी भरण्यात आला आहे.  दरम्यान, २०१५-१६ या वर्षात ७४ हजार ७८५ शेतकऱ्यांनी ५ कोटी ८९ लाख रुपयांचा विमा हप्ता भरला होता. त्यानंतर एकाही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नाही. २०१६-१७ मध्ये देखील ६६ हजार २३० शेतकऱ्यांव्दारे ९७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरण्यात आला. यावर्षी देखील विमा भरपाई देण्यात आली नाही. २०१७-१८ मध्ये ६८ हजार २७० शेतकऱ्यांनी ५ कोटी १६ लाख १४ हजाराचा विमा हप्ता भरल्यानंतर केवळ ३१.११ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT