बुलडाण्यात जबरदस्त; अकोला, वाशीमला पावसाचा जोर ओसरला
बुलडाण्यात जबरदस्त; अकोला, वाशीमला पावसाचा जोर ओसरला  
मुख्य बातम्या

बुलडाण्यात जबरदस्त; अकोला, वाशीमला पावसाचा जोर ओसरला

टीम अॅग्रोवन

अकोला ः गेल्या २४ तासांत वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस झाला. घाटावरील लोणार, मेहकर या तालुक्यांमध्ये जोरदार वृष्टी झाली. दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ५७ व ५६ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. तुलनेने अकोला व वाशीम या दोन्ही जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी (ता. ३) सकाळी आठ वाजेपर्यंत घेतलेल्या नोंदी नुसार बुलडाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात ५७.७ मिलिमीटर, तर मेहकरमध्ये ५६.७ मिलिमीटर पाऊस नोंद झाला. याशिवाय बुलडाण्यात ३५.६, चिखली २८.६, सिंदखेड राजा २९, खामगाव १४, मलकापूर १३.६, मोताळा २७.१ असा पाऊस झाला. मोताळा तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत सरासरीच्या ५५ टक्के पाऊस झाला. यामुळे या तालुक्यातील पलढग प्रकल्प तुडुंब भरला आहे. या प्रकल्पाची क्षमता ४०३.२० दलघमी आहे. सध्या १०० टक्के प्रकल्प भरला असून सांडव्यावरून ३७.१२ घनमीटर इतका विसर्ग सुरू आहे. या जिल्ह्यातील ज्ञान गंगा हा प्रकल्प ४३.८५ टक्के भरला आहे. मस, नळगंगा, पेनटाकळी, मन, तोरणा, उतावळी या प्रकल्पांच्या साठ्यातही वाढ होत आहे.     वाशीम जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ५.१४ मिलिमीटर पाऊस पडला. वाशीम तालुक्यात १७.६१, मालेगाव ६.९१, रिसोड ३.५३ अशी नोंद झाली. अकोला जिल्ह्यात पातूरमध्ये १३ आणि बार्शी टाकळी ७.८ मिलिमीटर पाऊस वगळता इतर अत्यंत हलक्या स्वरूपात पाऊस झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT