संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिन पडल्या होत्या बंद

टीम अॅग्रोवन

जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी १४ ईव्हीएम मशिन, १४ कंट्रोल युनिट, तर ६६ ठिकाणी व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने काही वेळ मतदान बंद पडले होते. लागलीच रिझर्व्ह असलेले ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशिन बदलण्यात आले आहेत. बंद पडलेल्या काळात मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नसल्याने मतदारांना अधिक वेळ वाट पाहावी लागली नसल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली. 

सर्वांत अगोदर रावेर मतदारसंघात काही मशिन बंद पडल्याच्या घटना घडल्या. नंतर तांत्रिक अडचणीमुळे मशिन बंद झाल्याचे प्रकार घडले. मात्र लागलीच ईव्हीएम मशिन, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट मशिन बदलून देण्यात आले. 

खानापुरातील केंद्रात व्हीव्हीपॅट पडले बंद  दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. भोर) येथील मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने मतदारांच्या रांगा लागल्या. प्रशासनाने त्वरित हालचाली करून पंधरा मिनिटांमध्ये नवीन व्हीव्हीपॅट मशिन बसविले आणि मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू केली. 

उरळगावात ईव्हीएम मशीन पडले बंद शिरूर तालुक्‍याच्या पूर्व भागातील उरळगावात एक तास ईव्हीएम मशिन बंद पडल्याने नागरिकांना एक तास ताटकळत बसावे लागले. नवीन ईव्हीएम मशिन आणल्यानंतर एक तासाने मतदान सुरू झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT