नाशिक जिल्हा बँकेतर्फे शंभर थकबाकीदार जाहीर
नाशिक जिल्हा बँकेतर्फे शंभर थकबाकीदार जाहीर 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्हा बँकेतर्फे शंभर थकबाकीदार जाहीर

टीम अॅग्रोवन

नाशिक  : नाशिक जिल्हा बँकतर्फे जिल्ह्यातील ऐपतदार, मोठे बागायतदार व हेतुपुरस्कर थकबाकी झालेल्या १० लाखांवरील १०० थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये माजी अध्यक्ष, संचालक पुत्र अशा अनेकांचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशा सभासदांकडे असलेली थकबाकी व त्यावर होणारे व्याज येत्या ७ जुलैपर्यंत भरणा करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूचित करून थकबाकीदार सभासदांनी कर्जाची रक्कम त्वरित भरणा करून बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष केदार आहेर यांनी केले आहे.

जिल्हा बँकेला पूर्वपदावर आणण्याकरिता आहेर यांनी कर्ज वसुलीसाठी जोरदार मोहीम चालू केली आहे. मार्चअखेर २७६९.६१ कोटी रुपये वसुलीस पात्र होते. ३० जूनअखेर ७८९ कोटी मुद्दल व व्याजाची २७२ कोटी रकम अशी एकूण ३० टक्के वसुली झालेली आहे. तसेच शैक्षणिक संंस्था, दूध प्रक्रिया संस्था, पतसंंस्था यांच्या माध्यमातून बिगरशेती कर्जाची ३ महिन्यांत ४ कोटींची वसुली झाली असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

२३७ कोटींचे पीक कर्जवाटप जिल्हा बँकेला शासनाने पीककर्ज वितरणासाठी ५०० कोटीचा लक्षांक दिलेला आहे. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खरे यांच्या अधिपत्याखाली सर्व व्यवस्थापकांनी पीक कर्जवाटपाकरिता जिल्हाभर दौरा केला. सर्व तालुका निबंधक, सहायक निबंधक, विशेष वसुली अधिकारी, विभागीय अधिकारी, गट सचिव यांच्या तालुका निहाय बैठका घेऊन कृती आराखडा तयार करण्यात आला. मागील १२ दिवसांत १३५ कोटींचे पीककर्ज वितरण केलेले आहे. बँकेने ३० जूनअखेर १३ हजार ३४८ सभासदांना २३७ कोटींचे पीककर्ज वितरण केलेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT