खानदेशात पेरण्या रखडत;  कमी पावसामुळे गती मिळेना Delaying sowing in Khandesh; Due to low rainfall, there was no speed
खानदेशात पेरण्या रखडत;  कमी पावसामुळे गती मिळेना Delaying sowing in Khandesh; Due to low rainfall, there was no speed 
मुख्य बातम्या

खानदेशात पेरण्या रखडत; कमी पावसामुळे गती मिळेना

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात खरिपातील पिकांच्या पेरणीला रखडत सुरवात झाली आहे. गुरूवारी (ता.१७) व  शुक्रवारी (ता.१८) दुपारी व सायंकाळी अनेक भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे पेरणीला शेतकऱ्यांनी अनेक भागात सुरवात केल्याचे चित्र आहे.  पण सर्वत्र पाऊस नव्हता. काही भागात पाऊस झाला, तर काही भागात ऊन तापत होते. दर आठ ते १० किलोमीटरनंतर पावसाची स्थिती वेगवेगळी अशीच होती. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात जळगाव, धरणगाव, एरंडोल, पाचोरा आदी तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. काही मंडळांमध्येच चांगला पाऊस झाला. जळगाव तालुक्यात सर्वत्र मध्यम पाऊस होता. त्यामुळे पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. हवा तसा पाऊस नसल्याने सोयाबीनची पेरणी मात्र शेतकरी करीत नसल्याची स्थिती आहे.   कोरडवाहू कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी यांची पेरणी मात्र सुरू झाली. हवा. पाऊस झाल्यानंतरच किंवा ५० मिलीमीटर पाऊस एकाच दिवसात झाल्यानंतर सोयाबीन पेरणी करा. सध्या सोयाबीन पेरणी टाळा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे मध्यंतरी जाहीर झाले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद होता. पण पावसाने अनेक भागात हूल दिली. काही तज्ज्ञ खानदेशात २१ जूननंतर पाऊस येईल, असे सांगत आहेत.   धुळे व नंदुरबारातही पाऊस काही शेतकऱ्यांनी पेरणीला शनिवारी (ता.१९) सुरवात केली आहे. पण . सकाळी ऊन तापत असल्याने वाफसा स्थिती नाहीशी होत आहे. यामुळे किमान थंड किंवा ढगाळ वातावरण हवे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. खानदेशात सुमारे पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. यात पूर्वहंगामी कापूस लागवड अधिक आहे. कोरडवाहू पिकांची पेरणी शनिवारीच सुरू झाली. पण पेरण्या रखडत सुरू असून, सर्वत्र पेरणी नसल्याची स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT