समृद्धीसाठी २१३ हेक्टरचे सक्तीने भूसंपादन
समृद्धीसाठी २१३ हेक्टरचे सक्तीने भूसंपादन 
मुख्य बातम्या

नाशिक : समृद्धीसाठी २१३ हेक्टरचे सक्तीने भूसंपादन

टीम अॅग्रोवन
नाशिक : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्ह्यातील १९ गावांमधील २१३ हेक्टर क्षेत्राच्या अधिग्रहणाची अंतिम अधिसूचना रस्ते विकास महामंडळाने शुक्रवारी प्रसिद्ध केली. यामुळे आता भूसंपादन कायद्यान्वये जमीन संपादित करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
नागपूर ते मुंबई हे अंतर काही तासांमध्ये पार करता यावे, यासाठी समृद्धी महामार्गाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी आतापर्यंत ९०० हेक्टर जमीन थेट खरेदीद्वारे संपादित करण्यात आली आहे. परंतु, कौटुंबिक वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि प्रकल्पासाठी जमीन देण्यास असणारा विरोध यांमुळे २१३ हेक्टर जमीन अजूनही अधिग्रहित होऊ शकलेली नाही. त्यामुळे २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये या जमिनी अधिग्रहित करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. आता भूसंपादन कायद्यान्वये जमिनी अधिग्रहित करण्यात येणार असल्याने जमीनमालकांना चारपट मोबदला मिळणार आहे.
भूसंपादन कायद्यान्वये सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यांतील धामणगाव, गंभीरवाडी, बेलगाव तऱ्हाळे, धामणी, पिंपळगाव मोर, उभाडे, देवळे, खैरगाव, शेनवड बु., कांचनगाव, अवचितवाडी, तळोघ, तळोशी, पिंप्री सद्रोद्दिन, नांदगाव सदो, तारांगण पाडा, फांगुळ गव्हाण, बोर्ली आणि वाघ्याची वाडी आदी गावांमधील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT