मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन 
मुख्य बातम्या

‘सोलापूर बंद’ला काही भागात हिंसक वळण

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (ता.३०) पुकारलेल्या ‘सोलापूर बंद’मध्ये काही भागात टायर जाळणे, दगडफेकीचे प्रकार घडले. परिणामी, पोलिसांनीही लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अनेक ठिकाणी आंदोलकांची धरपकड केली; तसेच शहरातील प्रमुख भागांत कोम्बिंग ऑपेरशन केले. दिवसभर सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण राहिले.    दरम्यान, ग्रामीण भागातही या बंदचे पडसाद उमटले. अनेक गावांत बंद, रास्ता रोको, ठिय्या आंदोलन सुरूच होते.

मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी ‘बंद’ची हाक दिली होती. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठेच्या परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स शंभर टक्के बंद होती. त्याशिवाय शहरातही इतरत्र बंद पाळण्यात येत होता. शाळा, महाविद्यालयांनी स्वतःहून सुटी घोषित केली होती; तसेच काही पेट्रोल पंपही बंद होते; पण सकाळी अकराच्या सुमारास काही कार्यकर्ते शिवाजी चौकातील पुतळ्याकडे घोषणाबाजी करत आले. तिथे घोषणाबाजी आणि सरकारच्या निषेधाने वातावरण चांगलेच तापल्याने नेत्यांसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

परिणामी, काही हुल्लडबाजांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला, तसा जमाव पांगला. त्याशिवाय लागलीच या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी चोप दिला. निराळे वस्ती, जुना पूना नाका या परिसरातही पोलिसांनी हुल्लडबाजांना शोधून चोपले. काही वेळातच या भागातील परिस्थिती पोलिसांनी नियंत्रणात आणली. त्याशिवाय ग्रामीण भागातही मोहोळला रास्ता रोको, अक्कलकोट शहरात बंदसह चुंगीमध्ये गाव बंद आंदोलन करण्यात आले.

बाजार समितीची १२ कोटींची उलाढाल ठप्प सोलापूर बाजार समितीतील व्यवहार सोमवारी पूर्णपणे बंद राहिले. अत्यावश्‍यक सेवेत भाजीपाल्यासह कांद्याचे लिलावही होण्याची शक्‍यता होती; पण त्यांची आवकच सोमवारी झालीच नाही, शिवाय व्यापाऱ्यांनीही स्वतःहून बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे भाजीपाला, फुले, भुसार बाजार या सगळ्या विभागांत दिवसभर शुकशुकाट होता. बाजार समितीतील आजची एका दिवसाची जवळपास १२ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT